नांदेड| नांदेड तालुक्यातील वानेगाव, पोखर्णी, धनगरवाडी, गाडेगाव, कोर्टतीर्थ, वरखेड, थुगाव, दर्यापूर या गावातील गावठाणातील घराचे ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.
या गावठाणातील मिळकतीचे सनदा (नकाशे) तयार झाली आहेत. या सनदा भूमि अभिलेख कार्यालयाकडून 10 ते 12 मार्च 2022 या कालावधीमध्ये त्या-त्या गावात वितरीत करण्यात येणार आहेत. गावातील नागरिकांनी गावात उपस्थित राहून विहित शासकीय शुल्क भरणा करुन ही सनदा (नकाशे) प्राप्त करुन घ्यावीत, असे आवाहन नांदेडचे उपअधिक्षक भूमि अभिलेख यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालत
नांदेड| जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 8 मार्च 2022 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 8 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.