नांदेड| जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचना व कोविड-19 च्या सुरक्षा उपाययोजनेच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध कार्यालयांना देण्यात आले आहेत.
जागतिक महिला दिन साजरा करण्याबाबत शासन परित्रकाद्वारे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सूचना निर्गमीत केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहलिसदार, जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प., जिल्हा महिला बालविकास अधिकारी जि.प., बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक जि. प., उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांना या सूचना निर्गमीत केली आहे.
शासन परिपत्रकातील दिलेल्या सुचनेप्रमाणे मंगळवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद केले आहे.
महिला दिनानिमित्त योग प्रशिक्षण संपन्न - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा परिषद, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी मार्गदर्शन केले.
योग प्रशिक्षण डॉ. देशपांडे यांनी दिले. यावेळी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रेखा काळम, शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार, समन्वयक श्रीमती शितल चव्हाण, कर्मचारी आदी उपस्थित होते. कौशल्य विकास विभागाकडून प्रशिक्षण घेतलेले योगा थेरपी असिस्टंटचे सर्व प्रशिक्षणार्थी यांनीही यात सहभाग नोंदवला होता.