पक्की घरे माञ 'जैसे थे ' श्रीमंताच्या सोयीनुसार हदगाव शहरात राज्य महामार्गाच्या रोड व नालीचे काम -NNL


हदगाव,शे.चांदपाशा|
शहरात गेल्या वर्षापासुन राज्य महामार्गाचे काम कंञाटदाराच्या सोयीनुसार सुरु असुन हदगाव शहरात नई अबादी ते तामसा टी पाईट काही श्रीमंताचे अतिक्रमित पक्के बांधकामाला अभयदान देत बाकीची छोट्या व्यावसायिकांची अतिक्रमणे हटविल्याने रस्ता तर मोकळा झाला. परंतु उमरखेड टी पाईट ते डाँ मनाठकर पर्यत काही धानड्य व्यक्तीची अतिक्रमीत पक्के बांधकामास कञाटदाराने अभयदान दिल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातुन हदगाव तामसा भोकर कोरेगाव व लोहगाव  या राज्य महामार्गाचे काम सुरु आहे. पण हे कोट्यावधीचे रु काम कोणती एजन्सी करत आहे. या बाबतीत सार्वजनिक बाधकाम विभागाकडुन काही ही माहीती देण्यात येत नाही. विशेष म्हणजे जिथे मोठे काम सुरु असते तिथे काम करणा-या एजन्सीचे नाव काम करण्याचा कालवधी मंजुर असलेली रक्कम लिहण्यात येते. पण या बाबतीत तालुक्यातील जनतेला या बाबतीत काहीच माहीत नाही. फक्त इतकेच माहीत आहे की, काम करणारा हा बडा कञाटदार असुन तो 'बड्या साहेबाच्या 'जवळचा आहे असे सागण्यात येते.

श्रीमंताची पक्के अतिक्रमण कधी पाडणार ...हदगाव शहरात या राज्य महामार्गाचे रोड व नालीचे काम होत असल्याने शहराचा चेहरा मोहरा बदलल्याचे चिञ दिसत आहे. या मुख्यप्रवेश रोडवर नालीचे काम का थांबविण्यात आले. इतर ठिकाणी नालीचे काम घाईघाईनं करण्याचे कारण आता नागरिकांना माहीत झालेले आहे. श्रिमंताच्या पक्क्या अतिक्रमणावर बुलडोझर चालला नाही या बाबतीत ही नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पक्क्या आतिक्रमाणामुळे ही काम थांबलेले आहे. ह्या आतिक्रमण धनदाडग्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने काही अंशी कञाटदार ही संभ्रमात असल्याचे दिसुन येत आहे. या शहरातील मुख्यरोडवरचे अतिक्रमण केव्हा काढणार..? असा सवाल नागरिकां कडुन उपस्थित होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी