गावातून भैव्य मिरवणूक , देशभक्ती मय वातावरण
उस्माननगर, माणिक भिसे| शिराढोण ता.कंधार येथील भूमिपुत्र भारतीय सैनिक गंगाधर मारोती पांडागळे हे १७ वर्ष देशसेवा करुन सैन्यदलातून सेवा निवृत्त झाल्याने त्त्यांच्या स्वागतासाठी नांदेड ते शिराढोण या राष्ट्रीय महामार्गावरील गावागावातून देशभक्तांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात फटाक्यांच्या आतीशबाजीने व भारतमाता की जय , देशभक्तीपर गीताच्या निनादत जोरदार जल्लोषात सपत्नीक जागोजागी स्वागत केले.
शिराढोण ता.कंधार येथील भूमिपुत्र गंगाधर पांडागळे हे १७ वर्ष देशसेवा केली.ते सर्वप्रथम लष्करात ए.सी.पी.हवालदार म्हणून सेवा केली . त्यानंतर त्यांनी गोवा ,जम्मू काश्मीर, मथुरा, आसाम,पुणे, येथे रात्रीचा दिवस करून देशाची सेवा केली.कोर ऑफ सिग्नल या बटालियनमध्ये सेवा बजावली.आणि सिकंदराबाद येथील सैन्यदलात देशासाठी सेवा देताना २८ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले. गंगाधर पांडागळे यांनी देशासाठी सेवा करण्यासाठी सैन्यदलात भरती केली.गंगाधर पांडागळे यांच्या वडीलांनी व आईने मन मोठे करून मुलाला पाठविले.
भारत मातेच्या वीर सुपूत्राचे करावे तितके कौतुक कमीच असते,जीवाची पर्वा न करता भारत मातेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस पहारा देणारे जवान , त्यांच्या रक्षणामुळे भारतातील नागरिक शांत झोप घेतात.पण सैनिक डोळ्यात तेल टाकून बाॅडरवर तटस्थ राहून पहारा देतात.देशाच्या संरक्षणासाठी शत्रूसंगे दोन हात करण्याची त्यांची तयारी असते.म्हणून अतंगवादी घुसखोरी करू शकत नाही.१७ वर्ष देशाची सेवा करुन देशपुत्र मायभूमीत परततात.२८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नांदेड पासून ते शिराढोण पर्येंत सहपत्नीक त्यांचे जागोजागी ढोलताशांच्या, फटाक्यांची आतिषबाजीने हर्षाल्हासाने जंगी स्वागत केले.
भारतीय सैनिक गंगाधर पांडागळे यांच्या स्वागतासाठी अख्ख गाव उपस्थित होते.सैनिकाला पाहण्यासाठी महीला,पुरुष, तरुणांनी एकच प्रचंड गर्दी झाली होती.गावातील प्रमुख रस्त्यांवर देशभक्ती गीत , फटाके वाजवून मिरवणूक काढण्यात आली.व त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य कार्यक्रमात सेवानिवृत्त सैनिकासह पत्नीचा सत्कार करण्यात आला.यावेळी गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मेजर किशनराव कपाळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षण मंडळ पुणे अधिकारी गोविंदराव नांदेडे, से.नि.सिओ.शिवाजी कपाळे, जयराम पांडागळे, गणपतराव देवणे, शिवाजी चौडम, बालाजी पांडागळे, व्यंकटराव पांडागळे, गणपतराव पांडागळे, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पांडागळे यांनी केले ,प्रस्ताविक देवराव पांडागळे यांनी तर आभार मनोज जमदाडे यांनी मांडले.