या घटनेमुळे परत समाजाच्या दातृत्व शक्तीचा परिचय समाजाला घडला. दिनांक २२ फेब्रुवारी ला देऊळगाव माळी गावातील शेतमजूर कडुबा किसन गवई याचा हद्यविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र गवई यांनी सोशल मिडीयावर सुस्वभावी कडुबा किसन गवई यांचा मुलगा गणेशच्या इंजिनिअरिंग च्या शैक्षणीक खर्चासाठी आर्थिक मदतीचे आवाहन रक्षा विसर्जनाच्या दिवशी स्मशानभूमीत उपस्थितांना केले त्यावेळी 17 हजार 700 रुपये जमा झाले त्यामध्ये सरपंच किशोर गाभणे यांनी पाच हजार रुपये मदत दिली व हि पोस्ट गजेंद्र गवई यांनी सोशल मिडीयावर टाकली तेव्हा मेहकर येथील मातोश्री हास्पिटलचे तज्ञ एम डी मेडिसिन सुप्रसिध्द डॉ.विजय चर्हाटे यांनी मयत कडुबा गवई यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणासाठी पंधरा हजार रुपयाची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानुसार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध डॉक्टर विजय चर्हाटे यांनी मयत कडुबा किसन गवई यांच्या परीवारास सांत्वनपर भेट देऊन यांच्या पत्नी व मुलाच्या जवळ पंधरा हजार रुपयांची रोख मदत सुपुर्त केली तसेच असंख्य गावकऱ्यांनी आपल्या परीने कुणी शंभर ,पन्नास, कुणी पाचशे रुपये रक्कम या गरीब कुटुंबातील व्यक्तीसाठी जमा केली हि मदत रू ४० चाळीस हजार रूपये एवढा आर्थिक निधी उभा करून समाजापुढे एक आदर्श उभा केला. आर्थिक मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य दानशूर व्यक्तींनी गवई यांना एक अपंग मुलगा,एक मतिमंद मुलगी व पत्नी यानां लोकांनी आर्थिक रक्कम जमा करून त्या कुटुंबाला आधार दिला. या धकाधकीच्या जीवनात सुद्धा देऊळगाव माळी मध्ये पुन्हा एकदा माणूसकीचा पाझर फुटला याचा प्रत्यय गावकऱ्यांनी दाखवून दिला.
देऊळगाव माळी गावातील सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र गवई व पञकार कैलास राऊत यांनी यापूर्वीसुद्धा ज्या ज्या कुटुंबावर संकट आली त्यामध्ये काही च्या घराला आग लागली असेल त्यांच्या घरामध्ये कुणाचे आजारपण असेल सोलापूर कोल्हापूरचा महाप्रलय,कोरोणाच्या काळात असेल त्या प्रत्येक वेळेस वेळोवेळी फुल न फुलाची पाकळी म्हणून त्या संकटातील व्यक्तीला धीर देण्याचे काम आर्थिक मदतीच्या माध्यमातून करण्यात आले, याप्रसंगी सरपंच किशोरभाऊ गाभणे, भास्कर गवई, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मगर, पञकार कैलास राऊत,राजेश मगर, लार्ड बुद्धा टि.व्हिचे संवाददाता गजेंद्र गवई, पंढरीनाथ मगर ,विठ्ठल गवई यांची उपस्थिती होती , डॉ.विजय चर्हाटे यांच्या सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या आर्थिक योगदामुळे त्यांचे संपुर्ण मेहकर तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे .