कंचनी लघुपट मोठ्या पडद्यावरही यशस्वी होणार.. जेष्ठ पञकार सिद्धेश्वर पवार -NNL


देऊळगाव माळी, कैलास राऊत।
मेहकर सारख्या ठिकाणी लघुपटाचे पूर्णपणे चित्रण करून व मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या कलावंतांना याठिकाणी संधी देऊन हा लघुपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला असून त्यामध्ये या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत निश्चित कौतुकास्पद आहे कंचनी लघुपट एक रहस्यमय स्वप्न कथा भाग एक हा इथेच संपला नसुन कंचनी लघुपट निश्चित मोठ्या पदापर्यंत मजल मारून यशस्वी होईल असे प्रतिपादन या लघुपटाचे उत्कृष्ट संवाद लेखक, ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी केले असून ते देऊळगाव माळी येथील तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलास राऊत यांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ बोलत होते.

कंचनी एक स्वप्नमय रहस्यकथा या लघुपटात उत्कृष्ट प्रकारे भूमिका केल्या बद्दल निर्माता-दिग्दर्शक विजय फंगाळ व त्यांच्या सर्व सहकारी कलावंतांचा भव्यसत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त शाखा अभियंता नारायण आत्माराम बळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांच्यासह लघुपटातील सर्व कलाकार उपस्थित होते पत्रकार कैलास राऊत यांच्या निवासस्थानी सर्वांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला , कंचनी हा लघुपट ग्रामीण भागात व शहरी भागातही या लघुपटाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे कंचनी महालाची गतकाळातील वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घ्यावा व कंचनीचा महाल जतन करावा याचे चित्रण या लघुपटात साकारण्यात आला आहे तो आवर्जून सर्वांनी बघावा असा आशावाद निर्माता विजय फंगाळ यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.ए बळी यांनी या लघुपटात भुमिका साकारणाऱ्या बाल कलाकारांना प्रोत्साहनपर दोन हजार एक रुपये बक्षीस दिले, भविष्यात लघुपट निर्मितीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भुमिका विशद केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार कैलास राऊत यांनी केले, मान्यवरांच्या हस्ते राजगुरू कोचिंग क्लासचे विद्यार्थी राज्यस्तरिय बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल कु. पूनम रामदास गिरी,कु.हर्षदा संतोष गिर्हे, देवानंद विष्णु राजगुरू या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. संजय जाधव संतोष गिर्है ,विष्णू राजगुरू, दत्ता राऊत, रवी सुरूशे,सोनाली राऊत , यासह तरुणाई फाउंडेशन चे सदस्य व कंचनी लघुपटातील नेहा काळे,वैशाली सावजी,सिद्धार्थ जाधव,राहुल उमक,समीर शिरवळकर,मनोहर म्हळसणे,विजय फंगाळ,किरण कानोडजे,सोनल सास्ते,विठ्ठल खरात,जयदेव हेंद्रे,वेद काटकर,सायली फंगाळ,प्रशिका ताजने,शिवराज फंगाळ,अश्वजित गवई,विनोद सौभागे,संस्कृती काटकर,दुर्गा काळे,दत्तात्रय वानखेडे,इ.सहकलाकारासह , राजगुरू कोचिंग क्लासचे विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.अनिल कलोरे सर यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तरुणाई फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी