जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दि.२८ व २९ मार्च रोजीचे करणार आंदोलन
नांदेड| अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नांदेड जिल्हा कमिटीने दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन रेशन कार्ड, घरकुल व श्री रेणुका देवी संस्थान माहुरगड कर्मचाऱ्यांच्या मागण्याचे निवेदन देऊन तातडीने मागण्या सोडविण्याची विनंती केली होती.
महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेऊन संघटनेस पत्र पाठवून घरकुला संदर्भात माहिती देऊन सहकार्य केले आहे परंतु किनवट उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आणि श्री रेणुका देवी संस्थान चे सचिव यांनी व तहसीलदार नांदेड यांनी अध्याप आपले म्हणणे काय आहे हे कळविलेले नसल्यामुळे दिनांक २९ व २९ मार्च रोजी चे जनवादी महिला संघटनेचे उपोषण व धरणे आंदोलन अटळ आहे. अशी माहिती जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा निमंत्रक कॉम्रेड करवंदा गायकवाड व नांदेड तालुका अध्यक्ष कॉम्रेड लता गायकवाड यांनी दिली आहे.
दिनांक २५ मार्च रोजी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी उशिरा जमसंच्या कार्यालयात पत्र आणून दिले असून मनपाने सहकार्य केले असे मत उपोषणार्थी व जमसं च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. परंतु श्री क्षेत्र माहूरगड येथील श्री रेणुका माता संस्थानातील कर्मचारी मागील ७९ दिवसापासून मातेच्या पहिल्या पायरीजवळ सत्याग्रह करीत आहेत परंतु भाप्रसे कॅडरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा श्री रेणुका देवी संस्थान चे सचिव कीर्ती किरण पुजारी हे कर्मचाऱ्यां प्रति बेकायदेशीर भूमिका निभावताना दिसत आहेत. तत्कालीन संस्थानचे सचिव आणि माननीय अध्यक्षांनी पारित केलेल्या ठरावा प्रमाणे श्री रेणुकादेवी संस्थानातील कर्मचार्यांना सेवा पुस्तिका देऊन पगारवाढ करणे आवश्यक आहे.
परंतु अत्यंत मुजोर व पदाचा गैरवापर करणारे किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी पुजार यांनी अद्याप कसलेही पत्र काढलेले नाही किंवा गडावरील आंदोलन थांबविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत हे निषेधार्ह आहे. तसेच नांदेड तहसीलदार यांनी देखील अद्याप उत्तर दिले नसल्यामुळे अ.भा.जनवादी महिला संघटनेचे दिनांक २८ व २९ मार्च रोजी चे आमरण उपोषण व धरणे आंदोलन अटळ आहे अशी माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. या आंदोलनात शेकडो महिला सामील होणार आहेत.