देशभक्तीमय वातावरणात शहीद दिन उत्साहात साजरा -NNL


नवी दिल्ली|
सद्गुरु मल्लीनाथ महाराजांच्या संकल्पनेतून जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्यावतीने सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियममध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचा अमर बलिदान दिन देशभक्तीपर कार्यक्रम नुकताच देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहीद देशभक्तांच्या जयघोषणाने परिसर दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री भगवंत खोबा, सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्‍वर गुरुजी, गुलबर्गाचे खासदार उमेश जाधव, आमदार बी.जी. पाटील, आमदार राजकुमार पाटील, आमदार बसवराज मती मोड, इंद्रसेन आरएसएस उत्तर भारत प्रमुख, कॅप्टन एम.एस. बीटा, शहीद भगतसिंग यांचे वारस यदविंदर सिंगजी, रणजीतसिंगजी कामठेकर, रणजीतसिंग चिरागीया, परमजितसिंग चाहेल, बिदर गुरुद्वारा बलविंदर सिंग, दिल्ली गुरुद्वारा बोर्ड कमिटी प्रमुख यांची विशेष उपस्थिती होती. सर्व उपस्थितांनी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. 

सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाराच्यावतीने सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांचा फेटा, चोला घालून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी देश सर्वश्रेष्ठ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. केंद्रीय मंत्री खोबा यांनी सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या देशभक्ती जागरणाचा कार्यक्रम कार्याचे मोठ्या मनाने कौतुक केले. राष्ट्र सर्वश्रेष्ठ आहे हे सद्गुरु श्री मल्लिनाथ बाबांचे विचार देशाला वाचवणारे आहेत. 

कॅप्टन एम.एस. बिट्टा यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या अमर बलिदानाबद्दल व प्रखर राष्ट्रवादावर आपले विचार मांडले. स्वयंसेवक संघाचे उत्तर विभागाचे प्रमुख श्री. इंद्रेसजी यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या अमर बलिदानामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी केलेले बलिदान देशासाठी देशातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी ठरले आहे. शहीद भगतसिंग यांचे वंशज श्री यदविंद्र सिंग यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, देशाच्या कानाकोपर्‍यामध्ये घराघरात शहीद भगतसिंग, सुखदेव आहेत. 

भारत माता सेवा समितीने शहीदांना दिलेला सन्मान अतिशय प्रशंसनीय आहे. येत्या वर्षीचा शहीद दिवस भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या समाधीस्थळी घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच गुरुद्वारा बोर्ड नांदेडचे माजी अधीक्षक रणजीतसिंग चिरागीया यांनी शहीद भगतसिंग यांच्यावरील कविता सादर करुन त्यांना अभिवादन केले. अजितसिंग चाहेल यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचे बलिदान कधीच विसरु शकणार नाहीत. दिवसभर मुंबई येथील गायकांचा देशभक्तीपर गीतांचा गजर चालू होता. देशाच्या कानाकोपर्‍यातून हजारो देशभक्त व मल्लिनाथ बाबांचे भक्त उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी