नांदेड जिल्ह्यात 15 क्विंटल प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची हमीभावाने खरेदी होणार -NNL

राज्य सरकारचा निर्णय,भागवत देवसरकर यांच्या प्रयत्नांना यश


नांदेड|
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामातील अनुकुल हवामान व सिंचनासाठी उपलब्ध पाण्यामुळे हरभरा पिकाचे उत्पन्न यावर्षी समाधानकारक झाले आहे.सध्या बाजारात हरभऱ्याला रु.4250 ते 4500 प्रति क्विंटल भाव मिळत असून केंद्र शासनाचा हमीभाव मात्र रु.5230 आहे. 

खाजगी बाजारात हरभरा दर कमी असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आधारभूत किमती प्रमाणे खरेदीसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. मात्र राज्य सरकारने गेल्या वर्षी प्रमाणे शेतकऱ्याकडून हेक्टरी 11.5 क्विंटल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा, मागणी करून पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी शेतकऱ्याची व्यथा मांडली,जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे उत्पादन वाढीचा प्रस्ताव पाठवून दिला होता,राज्य सरकारने याला मान्यता देत हेक्‍टरी 15 सुधारित उत्पादकता निश्चित करण्यास मान्यता दिली आहे.


मागील वर्षाचे उत्पन्न कमी असल्यामुळे प्रति हेक्टर 11.5 क्विंटल एवढ्याच हरभऱ्याची विक्री आधारभूत खरेदी केंद्रात करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्षात या हंगामात निघत असलेले उत्पादन व शासनाने घालून दिलेली मर्यादा यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांच्याशी चर्चा केल्यानंतर या हंगामात पीक कापणी प्रयोगातील निष्पन्न झालेल्या उत्पन्नानुसार वाढ करण्याची त्यांच्याकडे मागणी केली होती,.

त्याबाबतच राज्य सरकारच्या पणन विभागाकडे पत्र पाठवलं होतं, त्या अनुषंगाने जिल्हातील सर्वच शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर हेक्टरी 15 क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांकडुन हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी