15 हजार टन मालाची वाहतूक, 2.33 कोटी रुपये महसूल
नांदेड| नांदेड रेल्वे विभागातून काल पहिल्यांदाच एकाच दिवशी 6 रेक मालगाड्या रवाना झाल्या. या 6 माल गाड्यांमधून देशातील विविध भागात 15195 टन माल वाहतूक करण्यात आली, ज्यातून रेल्वे ला 2.33 कोटी उपाये महसूल मिळाला. नांदेड विभागात स्थापन केलेल्या बिजिनेस डेव्हलपमेंट टीम च्या सततच्या प्रयत्ना मुळे हे शक्य झाले. या यशा बद्दल श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी बिजिनेस डेव्हलपमेंट टीम चे अभिनंदन केले. हे सहा रेक पुढील प्रमाणे:
१. औरंगाबाद येथून दोन वर्षांच्या अवधी नंतर आसाम राज्यातील गुवाहाटी जवळ अझारा येथे साखरेची वाहतूक करण्यात आली. ज्यात 2658 टन साखर पाठविण्यात आली. यामुळे रेल्वे ला 63.17 लाख रुपये महसूल मिळाला.
२. आदिलाबाद येथून प्रथमच तामिळनाडू राज्यातील तीरुपूर आणि इरोड येथे ज्वारी पाठविण्यात आली. या रेक मधून 2667 टन ज्वारी पाठविण्यात आली. ज्यातून रेल्वे ला 49.47 लाख रुपये महसूल मिळाला.
३. दौलताबाद येथून जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल येथे कंटेनर मधून 1184 टन माल वाहतूक करण्यात आली. यातून रेल्वे ला 06.14 लाख रुपये महसूल मिळाला.
४. नगरसोल येथून बिहार राज्यातील फातुवा येथे 3364 टन कांदा पाठविण्यात आला. यातून रेल्वे ला 36.52 लाख रुपये महसूल मिळाला.
५. परभणी येथून पश्चिम बंगाल राज्यातील दानकुनी येथे 2664 टन साखर पाठविण्यात आली. यातून रेल्वे ला 53.82 लाख रुपये महसूल मिळाला.
६. बसमत येथून गुजरात राज्यातील चालठाण येथे 2658 टन साखर पाठविण्यात आली. यातून रेल्वे ला 23.33 लाख रुपये महसूल मिळाला.