किनवट,माधव सूर्यवंशी| छत्रपती संभाजी राजें हे बहुजनांच्या न्याय हक्कस्तही उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे त्यांच्या उपोषणाला छावा संघटनेसह अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी किनवटमधून पाठिंबा दिला आहे.
छत्रपती संभाजी राजेंनी बहुजन समाजाच्या न्यायासाठी दि.२६ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समजासह बहुजन समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यात जिल्हा तेथे विद्यार्थी वसतिगृह, आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नौकरीत सामावून घेणे, कोपर्डी खटल्यातील गुन्हेगारास त्वरित शासन होऊन न्याय मिळावा, सारथी संस्थेस भरीव आर्थिक तरतूद करून सक्षम करणे, इएसबीएस, एसइबीएस प्रवर्गातील नियुक्त्या कायम करणे, आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडविणे या मागण्यास आमचाही जाहीर पाठिंबा आहे.
असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. यावेळी छावा संघटनेचे अध्यक्ष अर्विद पाटील कदम, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अजय पाटील कदम, स्वराज्य मित्र मंडळ नांदेड जिल्हा संस्थापक अध्यक्ष निरंजन भाऊ मिराशे पाटील,किरण ठाकरे पाटील पत्रकार,माधव चव्हाण पाटील,ओम काकडे पाटील,प्रमेश्वर पाटील,शिध्देश्वर आडकिने पाटील,श्री पवार, किशन पाटील मुंगल व सर्व किनवट परिसरातील सर्व मराठा बांधव उपस्थित होते.