हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात पुन्हा वाघाने दहशत पसरविण्यास सुरुवात केली आहे, असाच कांहींसा अनुभव वाघी येथील शेतकऱ्यास आला असून, रात्रीला त्याच्या आखाड्यावरील बछड्यावर वाघाने हल्ला करून ठार मारल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील ५ ते ६ महिन्याखाली वाघाने तालुक्यातील जंगल परिसरासह इतर ऊस असलेल्या भागात बस्तान मांडून शेतकऱ्यांना हैराण करून सोडले होते. आता पुन्हा वाघाने शहर वस्तीकडे शिरकाव सुरु केला असून, तालुक्यातील वाघी गटग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या मौजे किरमगाव परिसरात शेती असलेल्या बापूराव विठ्ठल माने या वाघी येथील शेतकऱ्याच्या गट क्रमांक २ मध्ये असलेल्या शेतातील आखाड्यावर दि.२७ च्या रात्रीला बिबट्या वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात एक बछडा गतप्राण झाला असून, यास शेतकरयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेचा वनविभागाने पंचनामा करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणी वाघाचा शिरकाव इतर शेतकऱ्यांच्या आखाड्याकडे होणार नाही. याची काळजी घेऊन शेतकऱ्यांना जागृत करावे अशी मागणी या भागातील शेतकरी नागरीकातून केली जात आहे.