कोरोना नियमाचे पालन करून श्री दर्शन व कार्यक्रम साजरे होईल
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील दोन वर्षपासून सुरु सलेल्या कोरोनामुळे यंदाही महाशिवरात्रीमुळे होणारी श्री परमेश्वराची यात्रा साध्या पद्धतीने म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. दि.२७ फेब्रुवारी पासून ते ०६ मार्च दरम्यान विना पहारा, ज्ञानेश्वरी पारायण, आणि धार्मिक कीर्तन प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून, कोरोना नियमाचे पालन करून श्री दर्शन व कार्यक्रम साजरे होणार आहेत. याची नोंदणी भाविक, व्यापारी व जनतेने घ्यावी असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वराची महाशिवरात्रीला भव्य यात्रा भरविली जाते. तब्बल १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध, धार्मिक, समाजिक, शैक्षणिक, क्रीडा, यासह शेती विषयक कार्यक्रमा, आणि विद्विह प्रकारच्या शैत्याची दुकाने, आणि मनोरंजनाची रेलचेल चालत असते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून सुरु झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही शासनाची नियमावली लागू असल्यामुळे श्री परमेश्वराची महाशिवरात्र यंदा साध्या पद्धतीने होऊ घातली आहे. मागील काळात मंदिर कमिटीच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत घेलेल्या निर्णयानुसार दि.२७ फेब्रुवारी २०२२ पासून सकाळी ५ ते ६ काळात काकडा भजन, सकाळी ०७ ते १० दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ४ ते ५ दरम्यान प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ काळात हरिपाठ, रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत हरिकीर्तन होणार आहे.
ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ हभप शिवाजी महाराज जाधव वडगावकर हे सांभाळणार असून, विना पहारा, काकडा भजन, हरिपाठ हे श्री परमेश्वर देवस्थान भजनी मंडळाच्या वतीने होणार आहेत. सप्ताह दरम्यान दि.२७ रविवारी दुपारी ४ ते ५ काळात लक्ष्मीकांत वाळके गुरुजी यांचे प्रवचन रात्रीला ९ ते ११ काळात हभप. भैरवनाथ कुबेर महाराज रा.पंढरपूरकर यांचे हरी कीर्तन, दि.२८ सोमवारी दुपारी ४ ते ५ काळात दशरथ जाधव महाराज यांचे प्रवचन रात्री ९ ते ११ दरम्यान हभप.सत्यनारायण कास्टे महाराज रा.बुलढाणेकर यांचे कीर्तन, दि.०१ मार्च मंगळवारी सकाळी ९ ते ४ पर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन - पारायण, रात्रीचे ९ ते ११ वाजेदरम्यान हभप. शिवपुराणकार अभिमन्यू गिरी महाराज रा.पैठणकर यांचे हरिकीर्तन, दि.०२ बुधवारी दुपारी ४ ते ५ दरम्यान प्रकाशराव महाराज शिंदे यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११ काळात हभप.कु.भगवती किशोराव देशपांडे महाराज रा.नांदेडकर यांचे कीर्तन, दि.०३ गुरुवारी दुपारी ४ ते ५ दरम्यान रामराव महाराज बास्टेवाड यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान हभप.भागवताचार्य शिवाजी महाराज पवार रा.बिडकर यांचे कीर्तन, दि.०४ शुक्रवारी दुपारी ४ ते ५ दरम्यान नारायण अप्पा कारंडे यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११ दरम्यान हभप.प्रभू महाराज गोंगलीकर रा.रिसोडकर यांचे हरिकीर्तन, दि.०५ शनिवारी दुपारी ४ ते ५ दरम्यान वसंतराव कळसे गुरुजी यांचे प्रवचन रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान हभप.दिगंबर महाराज कंधारकर यांचे कीर्तन, दि.०६ रविवारी सकाळी १० ते पासून हभप.नारायण महाराज गरड रा. आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन आणि दुपारी ४ वाजता गोपाळकाला, दहीहंडी, प्रसाद वितरण होणार आहे.
दरम्यान या कीर्तनाला साथ सांगत हि संत तुकाराम भजनी मंडळी वडगाव यांची राहील. सायंकाळी केल्यांनतर राधाकृष्णाची झांकी मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने काढली जाईल. आणि सप्ताहाचा समारोप होईल. दरम्यान दि.२८ फेब्रुवारी पासून ते ०५ मार्च पर्यंत प्रतिवर्षाप्रमाणे ठरलेल्या समाज बांधवांच्या वतीने मंदिरात परंपरागत पंगती होतील. असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. मंदिरात धार्मिक कार्यक्रम, दर्शन व प्रसादासाठी येताना भाविकांनी रांगेत ठराविक अंतर ठेऊन, मास्क सैनिटायजरचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच श्री दर्शन घ्यावयाचे झाल्यास मंदिरात मूर्तीला हात लावता येणार नाही, उदबत्ती, आरती, वाट्या पेटविणे यास माई आहे. मंदिराच्या वतीने सैनिटायजरची व्यवस्था करण्यात येणार असून, मस्क वापरणे जरूर आहे, कोरोना संपला अश्या भ्रमात कोणीही न राहत कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून शांततेत श्रीदर्शन घ्यावे. देणगीदारांनी देणगी देताना देणगी कक्षातून पावती घ्यावी असेही मंदिर कमिटीच्या वतीने जरी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.