रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे ,या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून पंजाबराव डख यांना निमंत्रित केले आहे ते उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी तथा किसान ब्रिगेडचे नेते पुरुषोत्तम गावंडे आणि मांजरम गावचे भूमिपुत्र, नांदेड जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने आयोजित केला आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.