वरिष्ठाच्या आदेशाची कनिष्ठ अधिकारी अंमलबजावणी का करत नाहीत याचे लेखी ऊतर 9 मार्च 22 पर्यंत हिमायतनगर तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यानी द्यावे - चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी निवेदनाद्वारे दिला इशारा
देण्यात आलेल्या निवेदनात पुढील प्रश्न दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी करावी, दिव्यांग मित्र अॅप नांदेड 8 जुलै 2020 ची अध्याप अंमलबजावणी नाहि, दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदान वेळेवर का? मिळत नाही यांच्या कारणासहित माहिती द्यावी, तहसील मार्फत मिळणाऱ्या अनुदान पाञ करण्याची मिंटिग दरमहा का? होत नाही, मिंटिंग मध्ये पाञ झालेल्या लाभार्थ्यांना सहा ते सात महिने अनुदान का मिळत नाही? मंजुर झाले किंवा अपाञ हे लाभार्थ्यांना का? कळविले जात नाही याची माहिती देण्यात यावी.
तहसिल मार्फत अनेक योजनेत मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुर झालेल्या महिन्यापासून अनुदान दिले जाते कि त्यांचा नियम कसा आहे त्यांची माहिती देण्यात यावी, संजय गांधी ईतर योजनेत कमिटी का करण्यात आली नाही त्यात दिव्यांग बांधताना स्थानिक कमेटित का घेतले जात नाही, खासदार निधी दरवर्षी विस लाख दिव्यागाना स्थानिक मतदार संघात खासदार २०१६ पासुन का मिळत नाही? आमदार निधी पंधरा लाख दरवर्षी दिव्यांगाना स्थानिक मतदार संघात २०१६ पासुन का मिळत नाही?
अंत्योदय राशन योजना दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद आहे. आपल्या तहसिल मार्फत किती दिव्यांगाना लाभ दिला. किंव्हा दिला नाही यांचे कारणासहित माहिती लाभार्थी यादी द्यावी. सर्व नऊ प्रश्नांचे लेखि ऊतर देण्यात येईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, ता अध्यक्ष तुकाराम तांडरेवार अंकुश खिलारे लक्ष्मीबाई सोलेवाड भारत जाधव कार्तीक रामराम जाधव शामराव खिराडे, सिताराम बेले राम मिरासे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.