जयंतीनिमित्ताने शाळा व परिसराची विद्यार्थी व शिक्षकांनी केली स्वच्छता
नांदेड| शहरातील तरोडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यामंदिर प्रशालेत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी शाळा स्तरावरील विविध उपक्रमात सहभाग नोंदवला इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग नोंदवत गाडगे बाबा यांचे जीवन चरित्र सांगितले.
त्याबरोबरच शाळा व परिसराची स्वच्छता करण्यासाठीसुद्धा विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घेतला सर्व विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात बरोबर त्यांना सहभागी करून घेतले. शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर जाधव सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर सविस्तर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना गाडगे महाराजांच्या आयुष्यातील काही घटना सांगून महाराज कसे जुन्या चालीरीती परंपरा अंधश्रद्धेच्या विषयी लोकांचे प्रबोधन करायचे आणि त्या माध्यमातून शिका बाळांनो शिका म्हणून शिक्षणाचे महत्व सांगायचे हे विधान पटवून दिले.
शाळेचे सर्व शिक्षक प्रकाश पाटील यांनी गाडगे बाबा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत होते याविषयी व्यक्त झाले त्याबरोबरच सहशिक्षक चंद्रकांत क्षिरसागर सर यांनी गाडगे महाराज यांची महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला असला तरी ते आपल्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कसे परीक्षेत झाले आहेत याचे उदाहरण दिले.
सहशिक्षक सुनील जोंधळे यांनी गाडगे महाराज यांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले.महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजापुढे आपल्या श्रमांचा कसा आदर्श समोर ठेवला याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
शाळेचे सहशिक्षक गजानन जाधव सर यांनी गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली. या काळात गाडगे महाराजांनी चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले सहशिक्षिका सौ गिरी व नितीन आवारे यांनी कार्यक्रमानंतर शाळा व परिसराची स्वच्छता विद्यार्थ्यांना सोबत घेऊन परिसरातील लोकांचे स्वच्छतेविषयी प्रबोधन केले अशाप्रकारे राष्ट्रमाता विद्यामंदिर प्रशालेत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.