नांदेड। जुन्या पिढीतील प्रसिद्ध वकील श्रीकांत देविदासराव भोरे (वय 86) यांचे आज (दि. 23) रात्री 7. वाजून 40 मिनिटांनी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते 1961 पासून वकिली व्यवसायात होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, बहिणी, मुले उमेश, शैलेष, निलेश, दोन मुली सुषमा, तनुजा, सूना, नातवंडे, नातसूना असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या वजिराबाद येथील भोरे काॅम्प्लेक्स या निवासस्थानावरुन निघणार असून त्यांच्या पार्थिवावर गोवर्धन घाट येथील शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.