समाजातील उपेक्षित लोकांना न्याय मिळवून देणे हीच दर्पणकारांना आदरांजली ठरेल - गोपतवाड
हिमायतनगर| चांगल्या कार्याला समाजपुढे मांडून समाजाला दिशा देण्याचे कामामध्ये पत्रकारांचा वाटा मोठा आहे. बातम्या प्रकाशित करताना चांगले कार्य करणाऱ्यांच्या दोन्ही बाजू तपासूनच खरी वस्तूथिती समाजापुढे आणण्यात पत्रकार नेहमीच अग्रेसर असतात. समाज आणि पत्रकार यांचे नाते घट्ट व्हावे यासाठी पत्रकारांनी दुर्लक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी लिखाण करावे. बाळशात्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा आदर्श घेऊन पत्रकारांनी सामाजिक पत्रकारितेचा वसा जोपासावा, असे आवाहन हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले.
ते हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या वतीने दि. ६ जानेवारी या पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, डीएसबीचे कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, त्रीरत्नकुमार भवरे, असद मौलाना, अशोक अनगुलवार, दत्ता शिराने, अनिल मादसवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, सोपान बोम्पिलवार यांच्यासह पत्रकार, छायाचित्रकार, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रथमत: आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन उपस्थित पत्रकारांना पुष्पगुछ, पेन भेट देऊन सन्मानित करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड म्हणले कि, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा हा सामाजिक पत्रकरितेचा वसा पुढे नेण्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, उपक्षितांचे प्रश्न पत्रकारांनी आपल्या लेखणीतून मांडणे आवश्यक आहे. दर्पणकारांची जी तत्वे, मूल्ये आहेत ती सर्वांनी अंगिकारली पाहिजेत. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून शहर व तालुक्याच्या विकासाला कशी चालना देता येईल. आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कार्याला समाजापुढे ठेऊन त्यांच्याकडून अधिकाधिक चांगले कार्य कसे करून घेता येईल या दृष्टिने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आपल्या पत्रकारितेतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून समाजातील उपेक्षित लोकांना न्याय मिळवून देणे हीच दर्पणकारांना आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले. यावेळी पत्रकार पाशा भाई, संजय कवडे, दिलीप शिंदे, मनोज पाटील, मारोती वाडेकर, परमेश्वर शिंदे, दत्ता पुपलवाड, डाऊ गाडगेवाड, विष्णू जाधव, अनिल नाईक, अंगद सुरोशे, गायकवाड, आदींसह अनेक पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी चर्चा करताना पत्रकारांना सांगितले कि, पोलीस स्थान सप्ताह सुरु आहे, त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेतले गेले आहेत. तसेच कोरोना बाबत जनजागृती केली जात आहे. पत्रकारांनी देखील आपल्या तालुक्यातील जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती करणे गरजेचे आहे. शहर व तालुक्यात होत असलेल्या घडामोडी पाहता, आमचे पोलीस दिवस रात्र काम करत आहेत. मागील सोयाबीन चोरी प्रकरणातील चोरट्याना आम्ही अटक केली आहे. काहीजन फरार आहेत, त्यांनाही लवकरच अटक करून चोरीला गेलेला माल जप्त केला जाईल. हिमायतनगर येथील लोकसंख्येच्या मानणे आमचे पोलीस संख्या कमी आहे. सध्या पोलीस भरती नसल्याने नव्याने पोलीस बळ मिळणे शक्य नाही. मात्र होमगार्ड सारखे काही कर्मचारी आम्हाला जर सोबती दिले तर तालुक्यातील घटना घडामोडीचा तपासाला गती देण्यासाठी आम्हाला मदत होईल असेही ते म्हणाले.