हिमायतनगर| मागील काही दिवसापासून चोरीचे सतार थांबल्याने नागरिक निश्चित झाले होते, मात्र पुन्हा एकदा तालुक्यातील सवना गावात मध्यरात्रीच्या चोरीची घटना घडली असून, येथून चोरटयांनी दागिन्यांसह नगदी रक्कम लंपास केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील मौजे सवना येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून घरातील अलमारीत ठेवलेले ६३ हजाराचे दागिणे व नगदी ५० हजार असे एकूण १ लाख १३ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना राजू पंडीतच्या घरी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास झाल्याची फिर्याद त्यांनी हिमायतनगर पोलिसात दिली आहे.
या चोरीच्या घटनेमुळे तालुक्यात पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले असल्याचे दिसते आहे. या याबाबत हिमायतनगर पोलीस डायरीत नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन पुन्हा गावात चोरीच्या घटना घडणार नाहीत याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यातून केली जात आहे.