हिमायतनगर| हिमायतनगर येथील नगरपंचायतीवर आमची सत्ता आल्यानंतर दुसऱ्या वर्षी पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून १४ लाखाचा निधी मंजूर करून आणला होता. दरम्यान अडीच वर्षाच्या कार्यकाळ संपल्याने आमच्या हातून सत्ता गेली, त्यानंतरच्या सत्ताधार्यांनी पत्रकार भावांचा प्रश्न निधी असताना देखील रखडत ठेवल्यामुळे तो निधी परत गेला आहे. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला, आता मी तुमच्यासह सर्व जनतेच्या आशिर्वादामुळे आमदार झालो आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा येथील पत्रकार भवनासाठी निधी मंजूर करून आणून जेष्ठ पत्रकारांच्या पेन्शनसह इतर समस्या अधिवेशनातून मांडणार असल्याचे प्रतिपादन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केला.
ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दि.०९ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या दर्पण दिन कार्यक्रमाच्या मंचावरून बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ नेते लक्ष्मणराव शक्करगे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच अनाथांची माय स्व. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर लागलीच हिमायतनगर येथील पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुछ व सन्मानपत्र देऊन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पुढे बोलताना आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले कि, पत्रकार हा समाजाचा फार महत्वाचा घटक आहे, नेहमी आरसा दाखविण्याचे काम करतात. एखादा कोणी अडचणीत आला, कोणाची रुग्णालयांची समस्या असली ती बातमी प्रकाशित झाली तर ती समस्या सुटल्याशिवाय राहत नाही. हे मी अनुभवलेले आहे, कारण तुमच्या लेखणीत एवढी ताकत आहे कि, आपण समजला खूप काही मोठं कार्य करत आहेत. पत्रकारांना एवढीच विनन्ती आहे कि, एखाद्यावेळी काम करताना माजी जरी चूक झाली तर ती त्याची बातमी देऊन चूक निदर्शनास आणून दिली पाहिजे. तरच आम्हालाही त्याची जाणीव होईल आणि चुकीची सुधारणा करण्याची संधी मिळेल. पत्रकारांनी सत्यता हे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम केले पाहिजे असे माझे वयक्तीक मत आहे.
विकासाच्या बाबतीत सत्य ते मांडण्याचे काम पत्रकार करतात. त्यामुळे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पत्रकार भवनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नांदेड जिल्ह्यात पाहिलं पत्रकार भवन मी तामसा येथे उपलब्ध करून दिल. दुसरं पत्रकार भावनांचा नारळ हिमायतनगर येथे फोडून निधीही उपलब्ध करून दिला होता. पण मधल्या काळात काय..? झालं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही हे सर्वाना माहित आहे. कारण निधी मंजूर करून आणण किती कठीण आहे, मात्र आयत्या पिठावर रांगोळ्या ओढणे सोपं असल्याचे म्हणत त्यांनी नाव न घेता मागील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. पत्रकारांना मला एक विंनती करायची हिमायतनगर येथे आलेल्या पत्रकार भवनांचे पैसे परत जाण्यास आणि यास कारणीभूत कोण आहे, याची पत्रकारांनी चौकशी करून सत्यता उजेडात आणायला पाहिजे.
तुमच्या सारख्या सर्वांचा आशीर्वादाने आज मी आमदार पदावर आहे. त्यामुळे परमेश्वर महाराजांच्या या नगरीमध्ये पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पत्रकार भवनास निधी मंजूर करून आणायचे काम करणार आहे. येथे काम करताना राजकारण्यांनी कुठं राजकारण करायचा तिथेच राजकारण करायला पाहिजे, मात्र मागच्या काळात नको तिथे राजकारण करून तालुक्याचे शहराचं नुकसान करण्याचा काम झालं आहे. जेष्ठ पत्रकारांना मानधन दिले जात होते, त्यात अनेक अडचणी आल्याने ते थांबले आहे. याबाबतही मी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून जेष्ठ पत्रकारांना मानधन मिळालं पाहिजे यासाठी अधिवेशनातून प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले.
आणि येथील पत्रकारांनी कोरोना काळात जीवाची पर्वा नं करता अनेक रुग्णांच्या मदतीसाठी वर्तमान पत्राच्या माध्यमातून पत्रकार बांधवानी कार्य केलं आहे. त्याबद्दल आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन करतो. असे म्हणत आ.जवळगावकर यांनी कोणतीही अडचण असेल तर केंव्हाही हाक मारा आमदार म्हणून नाही तर तुमचा सहकारी म्हणून सहकार्य करायला तयार आहे. असे अभिवचन त्यांनी यावेळी पत्रकारांना दिले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी जी.प.सदस्य सुभाष दादा राठोड, समद खान, माजी कृउबा संचालक रफिक सेठ, सुभाष शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, प्रथम नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान युसूफखान पठाण, माजी तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, गोविंद बंडेवार, हनीफ सर, फेरोज कुरेशी, पंडित ढोणे, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते, तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.