मुंबई| देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे संसदेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, प.पू. बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याच्या तैलचित्रास जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अभिवादन केले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच माझ्या सारखा एक सामान्य कार्यकर्ता एवढा मोठ्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत मला जाण्याचे भाग्य लाभले. त्याच्या विचारांवर त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर हा देश चालतो. देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश जागतिक पातळीवर आपला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी होतो आहे.
जम्मू काश्मीर साठीचे कलम ३७० हटवून एकसंघ राष्ट्र उभारणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्नपूर्ती करण्याचे व खऱ्या अर्थाने यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्याचे काम केंद्रातील भाजप व मोदी सरकार करीत आहे, असे आवर्जून सांगितले. स्वतंत्र समता बंधुता न्याय ही तत्वे यांनी या देशाला दिली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हा उपदेश आज लोकांसाठी किती गरजेचा ठरतो आहे. याचा आवर्जून उल्लेख करीत जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संसदेत अभिवादन केले.