टाकराळाच्या जंगलात आई व मुलाचा दगडाने ठेचून खून, वडिलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह -NNL

हिमायतनगर/भोकर/तामसा हद्दीतील खळबळजनक घटना; एक १८ वर्षीय युवक बेपत्ता  


हिमायतनगर/भोकर/तामसा|
नांदेड जिल्ह्यातील भोकर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे टाकराळा परिसरातील बांबूच्या जंगलात आज सकाळी तीन जणांचे मृतदेह आढळून आले असून, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आई व मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असून, त्यांच्या पायाला दोरीने बांधलेले आहे. तर वडिलांचा मृतदेह गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला असून, सर्वच जण एकाच कुटुंबातील आणि हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेभी येथील आहेत. त्यापैकी एक मतिमंद असलेला मुलगा बेपत्ता असल्याचे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, सादर घटना अंदाजे ५ ते ६ दिवसापूर्वी घडली असावी असे सांगितले जात आहे.  



याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुंबई येथे राहणारे कावळे कुटुंब हे मागील कोरोना काळात लावण्यात आलेल्या संचारबंदीनंतर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे टेभी या मूळ गावी आले होते. तेंव्हापासून आपल्याकडे असलेली अल्प जमीन कसून मिळेल ती शेतीची रोजमजुरीचे कामे करून उदार निर्वाह करत होते. अचानक मागील ८ ते १० दिवसापासून कावळे कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाले असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आज अचानक हिमायतनगर - भोकर राष्ट्रीय महामागार्वर असलेल्या मौजे टाकराळा परिसरातील बांबूच्या जंगलात तिघे जणांचे मृतदेह आढळून आले. त्यात आई सीमा शांतमन कावळे वय वर्ष ४०, सुजित शांतमन कावळे वय १७ वर्ष या दोघांचा मृतदेश हातपाय बांधून दगडाने ठेचून मारल्याचे अंगावरील खुणांवरून जाणवत आहे.

तर वडील शांतमन सोमाजी कावळे वय ४५ वर्ष यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हे तीनही प्रेत जंगलातील आजूबाजूला आढळून आले असून, गट क्रमांक १६४ मध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. हि बातमी मिळतच हिमायतनगर पोलीस घटनास्थळ दाखल झाले असून, हा भाग तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रांजणगावकर, एपीआय अशोक उदगीरे, सहाय्यक पोलीस अधिकारी चिरवले यांनी घटनास्थळी दाखल झाले. लागलीच श्वान पथक व ठसे तज्ञास पाचारण करण्यात आले असून, पंचनामा करण्यात आला आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यापैकी अभिजित शांतमन कावळे वय १८ वर्ष हा युवक बेपत्ता असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे हि घटना गुंतागुंतीची झाली असून, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून शोधकार्य केले जात आहे. या घटनेमुळे हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना कश्यामुळे घडली, या कुटुंबास कुणीतरी फूस लावून नेऊन खून केला का..? यासह विविध तर्क वितर्क लावले जात असून, याचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी