भागवत देवसरकर मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम.
हदगाव| भगवती देवी शेतकरी उत्पादक कंपनी राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्रच्या वतीने महाराष्ट्रातील थोर सप्तखंजिरीवादक,समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची सत्यपालची सत्यवानी व जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम गुरुवार दि 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता उमरी जहागीर ता.हदगाव येथे शेतकऱ्यासाठी सतत काम करणारे शेतकरीपुत्र भागवत देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला असल्याची माहिती भागवत देवसरकर मित्रमंडळ जिल्हा परिषद आष्टी सर्कलच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या कार्यक्रमात सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाबरोबरच परिसरातील प्रगतशील शेतकरी,समाजात झटणारे समाजसेवक,शासकीय सेवेत राहून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे कर्मचारी अधिकारी,कोरोणाच्या काळात कोरोणा निर्मूलनासाठी विशेष कार्य करणाऱ्या कर्मचारी व वैद्यकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी यांचा गौरव सन्मान, प्रमाणपत्र मानपत्र शाल श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिली असून जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमांच्या अनुषंगाने घालून दिलेल्या अटी पूर्ण करूनच हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे, परिसरातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद,लाभ घ्यावा अशी आग्रही विनंती आवाहन भागवत देवसरकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.