हिमायतनगर, अनिल नाईक| उत्तर प्रदेशांतील लखीमपूर खेरी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्री यांच्या मुलाकडून शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक ११ रोज सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने हिमायतनगर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
या बंधमाषयी सर्व व्यापारी, नागरिकांनी सहकार्य करून बंद यशस्वी करावे. तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्याने बंद मध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा असे आवाहन काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे यांनी केले आहे. सदरील बंदबाबतचे निवेदन त्यांनी हिमायतनगर पोलीस ठाणे यांना दिले आहे.