अर्धापूर| उतर प्रदेशातील लखीमपूर हत्याकांडातील सर्व आरोपींना कडक शीक्षा व्हावी,आरोपींच्या वडीलांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, शेतकऱ्यांवर जीप चढवून शेतकऱ्यांचे प्राण घेणाऱ्या योगी सरकारने राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोमवारी ११ आँक्टोंबर ला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,मित्रपक्षाच्या वतीने अर्धापूर बंद चे आयोजन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या मुलाने खुलेआम जीप चढवून शेतकऱ्यांचे प्राण गेले.दिल्ली येथील शेतकरी कायदा विरोधात दोनशे शेतकरी हुतात्मा झाले,आरोपीच्या वडीलांनी केंद्रीय राज्य मंत्र्याचा राजीनामा देऊन निपक्ष चौकशी व्हावी,आरोपींना कडक शिक्षा व्हावी,शासकीय तिजोरीतील निधी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वाटप करुन अनेकांचे प्राण घेणाऱ्या योगी सरकारचा निषेध करण्यासाठी अर्धापूरात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पीआरपीच्या वतीने सोमवारी ११ आँक्टोंबर अर्धापूर बंद ठेवण्यासाठी बैठक घेऊन अर्धापूरातील सर्व दुकानदारांना आपापली दुकाने बंद ठेवण्यासाठी सरचिटणीस संजय देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,शहराध्यक्ष राजेश्र्वर शेटे,नगराध्यक्ष शेख लायक,निळकंठ मदने,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष कपाटे शहराध्यक्ष सचिन येवले,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उध्दवराव राजेगोरे,युवकचे पप्पू पाटील टेकाळे यांनी अर्धापूर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.