नायगाव,दिगंबर मुदखेडे | नायगाव तालुकयातील भोपाळा गावामध्ये नवरात्र उत्सव हा सण मोठ्या उत्सावात साजरा करण्यात येत आहे. या निमित्त दि. ११/१०/२०२१.रोजी लावणी सम्राट चित्रपट कलावन्त ,वाढीव दिसताय राव फेम मास्टर किरण कोरे यांच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रम सोशियल डिस्टन्स व सर्व नियम पाळून होणार आहे.
तसेच दि. १५/१०/२०२१.रोजी. श्री ह.भ.प.विलास महाराज गजगे बोथीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. किर्तनाचे नियोजन अखिल विश्व वारकरी परिषदचे नायगाव तालुका अध्यक्ष श्री संतोष संभाजी पाटील बावणे यांनी केलेले आहेत. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मृदुंग वादक ऋषिकेश पाटील बेळीकर, गायक विष्णू पाटील तांदळीकर, माधव पांचाळ, बापूराव पाटील टाकळीकर,तसेच भोपाळा व टाकळी गावातील भजनी मंडळ यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज बनसोडे, उपअध्यक्ष दत्ता कासराळे, सचिव विजय बनसोडे, सदस्य मारोती बनसोडे, मोहन बनसोडे, बाबू बनसोडे, सुरेश बनसोडे, गंगाधर बनसोडे, सतीश बनसोडे,रमेश बनसोडे, शिवाजी बनसोडे, परसराम कापशीकर, नामदेव बनसोडे, हानमंत दहिकांबळे, बालाजी बनसोडे, भिमराव बनसोडे, शामराव बनसोडे,पांडुरंग बनसोडे, परमेश्वर बनसोडे, राजेश बनसोडे, प्रशांत बनसोडे, श्रावण बनसोडे, विलास गायकवाड, रामा बनसोडे, प्रकाश बनसोडे, आदी परीश्रम घेत आहेत.