नांदेड| येथील पूर्णा रोड वरील नागोराव नरवाडे मंगल कार्यालयात रविवार, दि. १० ऑक्टोबर रोजी मित्र मंडळाच्या वतीने प्राचार्य डॉ. विकास कदम यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था 'एफटीआयआय'चे संचालक भूपेंद्र कैंथोला उपस्थित हे उपस्थित होते.
प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रोफेसर ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ. जीवन पिंपळवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पत्रकारिता विषयात विद्यावाचस्पती पीएच.डी. पदवी जाहीर झाल्याबद्दल नांदेड येथील मित्र मंडळातर्फे आयोजित प्राचार्य डॉ. विकास कदम यांच्या सत्कार सोहळा या कार्यक्रमात महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय वर्धा येथील डॉ. राकेश कुमार मिश्र, डॉ. संदीप सपकाळे, डॉ. शैलेश कदम यांची विशेष उपस्थिती होती.
नांदेड येथील पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी यानी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. राजेंद्र गोणारकर सर यांनी केले तर आभार डॉ. भारत कचरे सर नी मानले. या कार्यक्रमाला प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, प्रा. राहुल पुंडगे, प्रा. राज गायकवाड, प्रा. अमोल धुळे, प्रा. संजय नरवाडे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.