सकाळी 10 ते 11 कालावधीत साधता येईल संपर्क
नांदेड| देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरिक्षक पंकज (भा.प्र.से), आर. एन. एन. शुक्ला (खर्च), गोपेश अग्रवाल (पोलीस) हे नांदेड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. या निवडणूकीसंदर्भात जिल्ह्यातील नागरिकांपैकी कुणाच्या काही हरकती, तक्रारी, गाऱ्हाणी असल्यास निवडणूक निरिक्षक यांच्याशी सकाळी 10 ते 11 यावेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
नांदेड येथील मिनी सह्याद्री व्हीआयपी सुट शासकीय विश्रामगृह नांदेड येथे इच्छुकांना सकाळी 10 ते 11 यावेळेत भेटता येईल. कुणाला आवश्यकता भासल्यास निवडणूक निरिक्षक पंकज (भा.प्र.से) 9022820141, आर.एन.एन. शुक्ला (खर्च) 7498131456, गोपेश अग्रवाल (पोलीस) यांना 7498401148 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षक (पोलीस) दाखल हरकती असल्यास साधता येईल संपर्क
भारत निवडणूक आयोग यांच्याकडून देगलूर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (पोलीस) गोपेश अग्रवाल हे नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. निवडणूकी संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांपैकी कुणाच्या काही हरकती, तक्रारी, गाऱ्हाणी असल्यास निवडणूक निरिक्षक (पोलीस) गोपेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. गोपेश अग्रवाल यांना मिनी सह्याद्री व्हीआयपी सुट शासकीय विश्रामगृह नांदेड येथे भेटता येईल. कुणाला आवश्यकता भासल्यास त्यांना 7498401148 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.