हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करून तात्काळ अटक करण्याची मागणी
नायगाव, दिगंबर मुदखेडे| धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष पत्रकार तथा कॉमरेड सुभाष काकुस्ते याच्यावरिल झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणी हल्लेखोरास तात्काळ गुन्हा नोंद करून अटक करने बाबतचे निवेदन पोलीस ठाणे नायगाव याना मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पांडे व मराठी पत्रकार संघाचे नायगाव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १० ऑक्टोबर रोजी नायगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष कॉ. सुभाष काकुस्ते यांच्यावर घरात घुसुन हल्ला करून जिवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या हल्लेखोरावर कडक अशी कारवाई करून अटक तात्काळ करण्यात यावे यासाठी नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सुभाष यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरास तात्काळ अटक करण्यासाठी चे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे , जिल्हा कार्यकारणी सदस्य एस. एम. मुदखेडकर, माजी तालुकाध्यक्ष माधव मामा कोकुरले, शहराध्यक्ष विश्वंभर वने, मधुकर जवळे,नागोराव भोसले, संघटक शंकर अडकीने, कार्याध्यक्ष माधव धडेकर, मारोती कोम्पलवार, अंकुशकुमार देगावकर प्रसिद्धी प्रमुख संजय चिखले ,आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.