सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने यांचा सत्कार
नवीन नांदेड| नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या झालेल्या निवडणुकीत सिडको भागातील रहिवासी ज्येष्ठ विधीतज्ञ अँड.सतिश पुंड हे अध्यक्ष पदासाठी निवडुण आल्या बद्दल सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष श्री. विनोद माधवराव कांचनगिरे यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ, व भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
नांदेड जिल्हा अभिवकता संघाच्या निवडणूक मध्ये अध्यक्ष पदासाठी अँड.सतिशजी पुंड हे निवडुण आल्या बद्दल त्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अँड.पुंड यांनी आमचे काँग्रेस पक्षाशी फार एकनिष्ठ व घनिष्ट संबंध आहेत, स्वर्गीय कै. डॉ.शंकररावजी चव्हाण यांनी माझ्या वडिलाला काँग्रेस पक्षात एक मोठी जबाबदारी देऊन सलग तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य होण्याचा बहुमान मिळवून दिला. त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा अत्यंत ऋणी आहे. काँग्रेस पक्षाला जिथे कुठे माझी मदत होईल ती मी प्रामाणिक पणे करण्याचा प्रयत्न करेल.
असे सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले व यापुढे मला काँग्रेस पक्षाची सेवा करायची अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रा.डॉ. महेश पुंड नांदेड तालुका अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शेख असलम,कार्याध्यक्ष राजू भाऊ लांडगे, ,संजय कदम, अमोल जाधव,भुजंग स्वामी संतोष कांचनगिरे नामदेव पदमने, गणेश खंदारे,भगवान जोगदंड, अक्षय मुपडे, यांच्या सह पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत हटकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रमेश नांदेडकर यांनी मानले.