नायगाव/गडगा| महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी दिगांबर धात्रक यांनी अडोतीस वर्ष बॅंक सेवेसी एकनिष्ठ राहून प्रामाणिक पणे सेवा केल्याबद्दल व सेवानिवृत्ती निमित्त गडगा शाखेच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला.
गडगा ता. नायगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी म्हणून दिगंबर धात्रक यांनी गेल्या चार वर्षापासून काम केले. ग्रामीण भागात असलेली शाखा स्थलांतराच्या मार्गावर असताना धात्रक यांनी अथक परिश्रम घेऊन बँकेच्या ठेवी वाढविणे, वसुली करणे ,ग्राहकाचा समन्वय साधने या बाबीवर लक्ष केंद्रित करून ग्राहकांचा बँकेविषयी विश्वास निर्माण करुन बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
गेल्या अडोतीस वर्षांमध्ये निष्कलंक बँकेची सेवा करणारे अधिकारी म्हणून व त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी बालाजीराव ऐकाळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजीराव पन्नासे, जेष्ठ पत्रकार विकास भुरे, पत्रकार वसंतराव जाधव,शाखाधिकारी महेश कांबळे, योगेंद्र चटप, सुमित गायकवाड, त्यांचे कुटुंबीय सौ.निता धाञक,कु.इंजिनियर ऐश्वर्या दि.धात्रक, इंजिनीयर अभिषेक धात्रक,मलीकार्जुन बामणे, डॉ.संदीप मंगनाळे, रमेश अमलापुरे, गिरीधर हात्ते,भरत जाधव, सतिश माळगे, संदीप पाटील, बचत गट अध्यक्षा सौ.इंदुबाई निळकंठ जाधव,अंजली कोकणे, माधव डांबरगे, गजानन देवणे, बाबुराव इबितदार, पवार, बालाजी बोरीवाले, सौ.गायकवाड, स्वंय साय्यता महिला बचत गट, बॅंकेचे ग्राहक गावकरी यावेळी उपस्थित होते.