नविन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी राजरत्न मारोती इंगोले वय ३२ वर्ष यांच्ये काल दि,१ आक्टोबर रोजी खाजगी रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले , त्यांचा पार्थिव देहावर सिडको स्मशानभूमी येथे २ आक्टोबर रोजी शासकीय ईतमामंत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सलामी देऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.भोरे यांच्या सह ग्रामीण चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, अधिकारी कर्मचारी यांच्यी ऊपसिथीती होती.
ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेल्या एक वर्षापासून कार्यरत असलेले पोलिस पोलीस कॉन्स्टेबल राजरत्न इंगोले हे उपनिरीक्षक गणेश होळकर यांच्ये सहाय्यक म्हणून ते काम पाहत होते, गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते,उपचारा दरम्यान त्याचे खाजगी रुग्णालयात १ आक्टोबंर रोजी निधन झाले. त्याचा पार्थिव देहावर सिडको स्मशानभूमी येथे २ आक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सलामी देऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे, ग्रामीण चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या सह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, संकेत दिघे, विश्वजीत कासले, ऊपनिरीक्षक गणेश होळकर, आनंद बिचेवार, पाटील, महेश कोरे, व पोलीस कर्मचारी व परिवारातील सदस्य ऊपसिथीत होते. एक मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची पोलीस स्टेशन येथे ओळख होती.आई वडील,दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार असल्याची माहिती सहकारी पोलीसांनी दिली.