ब्रेक द चेन- सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमीत -NNL


नांदेड|
साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतूदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्वये प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहेत त्या कारणासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून  तसेच फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात रेस्‍टॉरंट आणि भोजनालय व इतर आस्थापना उघडण्यासाठी  पुढीलप्रमाणे सुधारित मार्गदर्शक सूचना आदेश निर्गमीत केले आहेत.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 चे नियम 10 व 11 अन्वये इतर सर्व अस्थापना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 चे नियम 19 अन्वये हॉटेल, रेस्टॉरेंटस व भोजनालय रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. पुढील आदेश निर्गमित होईपर्यत हा आदेश लागू राहणार आहे.आस्थपनांच्या अधिनस्त कर्मचारी, मालक, चालक, व्यवस्थापक सेवा पुरवठादार  यांनी कोविड 19 चे दोन्ही डोस  घेणे बंधनकारक आहे तसेच दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.वेळोवेळी ब्रेक द चेन आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.

पालन न करणाऱ्या नागरिकांना भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील.आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच शहरी भागात आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका पंचायत मुख्याधिकारी यांची राहील.आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांचे विरूध्द कार्यवाही केली जाणार नाही.या सर्व प्रक्रियेवनियंत्रण ठेवण्याची जबाबदारी Incident Commander) उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांची राहिल. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 22 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमीत केले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी