लोहा| उत्तरप्रदेश येथील लखीमपूर येथे ८ शेतकऱ्यांना चिरडले. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ मविआ ने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेनेचा सहभागी असून, लोहा शहर बंदमध्ये शिवसेना सर्व ताकदीने उतरणार आहे. शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना नेते बाळासाहेब पाटील कऱ्हाळे शहर प्रमुख मिलिंद पवार यांनी केले आहे
यूपीतील उखीमपूर खीरी या घटनेच्या निषेर्धात आज सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यव्यापी बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लोहा बंदची हक्क दिली आहे. काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस व घटक पक्ष बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या बंदमध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे.सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. असे असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख मिलिंद पाटील माजी तालुका अध्यक्ष सुरेश पाटील हिलाल, किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, शिवसेनेचे लोहा तालुका संघटक स्वप्नील पाटील गारोळे, यासह कार्यकर्त्यांनी केले आहे.