NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

मंगलवार, 18 जून 2019

आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज

केंद्रातील अंगणवाडी ताईंना ICDSCAS मोबाईलचे प्रशिक्षण आणि वितरण 

हिमायतनगर (अनिल मादसवार)  सर्वच क्षेत्रात ऑनलाईनचा वापर वाढला असून, आता अंगणवाडीचे दैनंदिन कारभार ऑनलाईन द्वारे चालणार असल्याने अंगणवाडी ताईंच्या कामकाजात प्रदर्शकता येणार आहे. एव्हडेच नव्हे तर कुटुंब सर्वेक्षण, बालकांचाही दैनंदिन नोंदी, लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, कुपोषित बालके, गरोदर माता, किशोरवण मुलींचं आरोग्याच्या नोंदी घेणे व त्यांची देखकभल करण्याच्या काटकटीपासून अंगणवाडी ताई आणि सेविकांची सुटका झाली आहे.


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील अंगणवाडीच्या कारभार ०१ जूनपासून थेट मोबाईलमध्ये सर्व प्रकारच्या नोंदणी ऑनलाईन घेऊन चालणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील अंगणवाडी सेविकाही हायटेक झाल्या आहेत. यापूर्वी अंगणवाडी सेविका ह्या दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असत. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांचे वाण, उंचीच्या नोंदीड रजिस्टरमध्ये घेत असता. आता ०१ जूनपासून अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले असणं, त्याद्वारे सर्व दैनंदिन नोंदी व कामाचा आढावा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. देण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेयर असून, यातून ICDSCAS सर्व उद्दीष्ठपूर्ण होणार आहे. यासाठी गटविकास अधिकारी ताठ बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीश मांजरमकर, यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी शिवाजी जामुदे, मास्तर ट्रेनर पर्यवेक्षिका ज्योती झाडे, ताई लोकरे, छाया कुबडे, बयाबाई क्षीरसागर, रचना शक्करगे, विजया दळवी यांच्या मार्फत १५ दिवसाचे सखोल प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यात आले आहे. यासाठी तांत्रिक सहाय्यक प्रकाश म्हेत्रे, गटसमन्वयक यांचे सहकार्य लाभले आहे. सादर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी श्री सोहेल शेख (कनिष्ट सहाय्यक) प्रस्तुत कार्यालय व दत्त वडेवाड प्रचार यांनी परिश्रम घेतले.

अंगणवाडी कामात पारदर्शकता येणार - गविअ. तथा बा.प्र.अ. सुधीश मांजरमकर
अंगणवाडी सेविका व मदतनीस याना या अगोदर अंगणवाडीचा सर्व हिशोब व व्यवहार १० रजिस्टर कागदपत्री लिहावे लागत होते. पण आत ऑनलाईन प्रक्रियेमुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दररोज या मोबाईलद्वारे आपल्या कामाची आकडेवारी व सेल्फी फोटोसह विद्यार्थी व उपस्थिती  मोबाईलवरच १० रजिस्टरची माहिती भरावी लागणार आहे. यामुळे आता अंगणवाडीच्या कामात पारदर्शकता येणार असून, वेळेची बचत होऊन कामात अचूकपणा येणार आहे अशी माहिती गटशिक्षण अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीश मांजरमकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.




कोई टिप्पणी नहीं: