NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

मंगलवार, 18 जून 2019

प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदानहिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक दत्ता मगर याना स्वामी रामानंद विद्यापीठाने नुकतीच अर्थशात्र विभागात पीएचडी प्रदान केली आहे. त्यांना पीएचडी मिळाल्यानंतर प्राचार्य सौ.सदावर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.


मराठवाड्यातील कृषी उत्पादन, खर्च आणि कृषी उत्पादन किमतीचा चीकित्सक अभ्यास विशेष संदर्भ नांदेड जिल्हा या विषयात प्रा.बी.डी.इंगळे, शरदचंद्र कला वाणिज्य महाविद्यालय नायगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीचडी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी केंद्रीय विकास मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील, कोषाध्यक्ष श्री अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. देवेंद्र जोशी, प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते आदींसह संस्थेच्या शिक्षक,  प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.   

कोई टिप्पणी नहीं: