NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

मंगलवार, 18 जून 2019

जागतिक योग दिनानिमित्त ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे योग व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

हिमायतनगर| जागतिक योग दिवस म्हणून दि.२१ जून हा सर्वत्र साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने तीन दिवसीय विविध मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात वैद्यकीय, जेष्ठ नागरिक, बालके, आणि महिलांसाठी डॉ.विशाखा गर्गे यांचे मार्गदर्शन लाभणार असून, मनुष्य जीवनात योगाचे महत्व सांगितले जाणार आहे.


प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने तीन दिवसीय विविध मार्गदर्शन व योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राजयोग मार्गदर्शन व अनुभूती यासह तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व प्रात्यक्षिकातून आणि मार्गदर्शनातून सांगितले जाणार आहे. शिबिराची सुरुवात दि.२० जून गुरुवारी रात्री ८ वाजता ओमशांती केंद्र यशनगर रेल्वे स्टेशन येथे होणार असून, यावेळी शहरातील वैद्यकीय व्यावसायिक यांना डॉ.विशाखा गर्गे ह्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर २१ शुक्रवारी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत राजयोग मार्गदर्शन व अनुभूती, येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये सकाळी ९ ते १०.३० या वेळेमध्ये शिक्षणासाठी आनंदी निरामय शिक्षक जीवन या विषयावर डॉ.विशाखा गर्गे यांचे मार्गदर्शन होणार असून, दुपारी ४ वाजता श्री परमेश्वर मंगल कार्यालयात शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी वर्तमानसमयी माझी भूमिका या विषयावर डॉ. विशाखा गर्गे ह्या जीवनात आलेल्या अनुभवाचा सदुपयोग कसा करावा, स्वास्त्याची काळजी, योग्य आहार, विहार, व्यायाम, औषधी, ध्यान याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर यात व्याख्यान, व्यायाम, प्रश्नोत्तरे आदींवर भर दिला जाणार आहे. तसेच दि.२२ जून शनिवारी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत परमेश्वर मंगल कार्यालयामध्ये राजयोग मार्गदर्शन व अनुभूती, यानंतर राजा भगीरथ विद्यालयात ९ ते १०.३० या वेळामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन आणि दुपारी ४ वाजता स्वास्थ्य नारी स्वास्थ्य समाज कि निव याबद्दल महिलांसाठी स्त्री आरोग्य आणि आदर्श जीवनशैली बाबत डॉ.विशाखा गर्गे या मार्गदर्शन करणार आहेत. आपली दिनचर्या, व्यायाम उपयोगिता, सामान्य आजार, सहज उपाय, आनंदमय चाळीशी, कैन्सर लक्षणे, तपासणी आणि मार्गदर्शन अशी रूपरेषा असणार आहे. या शिबिरामध्ये शहरातील त्या - त्या क्षेत्रातील नागरिकांनी व महिलांनी उपस्थित होऊन सहज राजयोग शिबिरात अष्ठांग योग्य, स्वास्त्य जीवनाचा आधार याचे महत्व समजून घ्यावे असे आवाहन ओमशांती राजयोग केंद्राच्या संचालिका शीतल दीदी यांनी केले आहे.कोई टिप्पणी नहीं: