NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

मंगलवार, 18 जून 2019

डाक विभागातील हेराफेरी प्रकारांचा मुख्य आरोपी पोस्ट मास्तर अजूनही फरार

संगणक चालक निलंबित होऊन जमानतीनंतर बाहेर  
 

हिमायतनगर| येथील डाक कार्यालयात सहा महिन्यापूर्वी उघड झालेल्या ३२ लक्ष ३० हजार ९५३ रुपयाच्या बहुचर्चित अपहार प्रकरणातील संगणक चालक बाबारावला आजच्या परिस्थितीत निलंबित करण्यात आले असून, जमानती नंतर बाहेर आहे. यातील मुख्य आरोपी तत्कालीन हिमायतनगरचा पोस्ट मास्तर अजूनही पोलिसांच्या हाती लागला नसल्याने फरार आहे. या आरोपीला पोलिसांपासून वाचविण्यासाठी आणि डाक विभागात झालेल्या भ्रष्टाचारावार पांघरून घालण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी घाम गाळत असल्याचे आता समोर येऊ लागले असून, या अपहार प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केल्यास भोकर येथील अधिकारी आणि काही कर्मचारी आरोपीच्या कठड्यात उभे राहतील...? अशी चर्चा डाक विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या दबक्या आवाजातुन पुढे येऊ लागली आहे.  

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. येथील तत्कालीन ब्रँच पोस्टमास्तर बाबाराव गणेश चव्हाण आणि हिमायतनगरचे तत्कालीन पोस्ट मास्टर शे.महेबूब यांनी संगनमताने हिमायतनगर शहरातील विठ्ठल कोमावार याच्या खात्यामधून ४ लक्ष ३० हजार ९५३ रुपयाची रक्कम परस्पर टप्प्या - टप्प्याने स्वतःच्या उपयोगासाठी उचलून अपहार केला होता. प्रत्यक्षात वरील दोघांनी शासन व खातेदार यांच्या ३२ लक्ष ३० हजार ९५३ रुपयाच्या रक्क्मेची हेराफेरी केल्याचे डाक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाअंती स्पष्ट झाले होते. याबाबत भोकर येथील चौकशी अधिकारी विश्वनाथ पदमे यांच्या तक्रारीवरून दि.१० जानेवारीला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन्ही आरोपींनि फरार होऊन अटकपूर्व जमीन करून घेण्याचा खटाटोप केला होता. यासाठी त्यांनी ३० लाखाची रक्कम जमा केली, परंतु त्यांना जामीन मिळू शकला नाही. खरे पाहता गुन्हा दाखल झाला त्याचं दिवशी हे दोन्ही आरोपी श्री पद्मे यांच्यासोबत डाक विभागात उपस्थित होते, तरीसुद्धा त्या आरोपीना पोलिसांच्या हवाली करण्याचे सोडून त्यांनी दोन्ही अपहरकर्त्यांना फरार होण्यास एक प्रकारे मदतच केली ते म्हणायला वाव आहे. त्यामुळे डाक विभागातील या अपहारामध्ये भोकरच्या डाक निरीक्षक अधिकाऱ्याचाही काही वाटा आहे कि काय..? अशी शंका या निमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे. 

आरोपी बाबाराव चव्हाण यांनी अटकपूर्व जामीन होत नसल्याने आपणास पोलिसांच्या तावडीत जावे लागेल हि वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून महाराष्ट्र सोडून दूर निघून जाण्याच्या तयारी केली होती.  तसेच शक्कल लढवून डाक विभागाची १ कोटी रुपयाची बनावट दस्तऐवज तयार करून या बॉण्डच्या आधारे परभणी येथील ओव्हर्सेस बैन्केत फाईल दाखल करून ७० लाखाच्या लोनसाठी खटाटोप केला. परंतु संबंधित शाखाधिकारी याना संशय आल्याने डाक विभागाशी संपर्क केल्याने सदरचे कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. याची माहिती त्यांनी नांदेड पोलीस विभागाला दिल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांनी परभणीला पथक पाठवून दि.३० जानेवारी २०१९ रोजी बैंकेत लोण उचलण्यासाठी आलेल्या बाबाराव गणेश चव्हाण यास ताब्यात घेतले. आजघडीला चव्हाण नामक संगणक चालक आरोपीची काही दिवसाच्या न्यायालयीन कोठडीतुन जमानत झाली असल्याने सध्या तो बाहेर आहे. यातील मुख्य आरोपी हिमायतनगर येथील तत्कालीन पोस्ट मास्टर शे.महेबूब आद्यपही फरार आहे. या दोंघांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने ग्राहकाच्या खात्यातील परस्पर रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे केंद्रस्तरावरील डाक विभागावर नागरिकाचा नव्याने विश्वास बसने अवघड झाले आहे. हि विश्वासहर्ता कायम राहावी म्हणून नांदेडच्या वरिष्ठानी आणखी कुठे कुठे शासकीय रक्कमेची अफरातफर केली होती काय..? यासाठी प्रत्येकाचे खरे पुस्तक आणि लेजर खाते यांची तपासणी कारण अहवाल सादर करण्याचे आदेशित केले. परंत्तू खरोखर हि तपासणी पूर्ण झाली काय..? आणि प्रत्येक ग्राहकांची डाक विभागातील रक्कम सुरक्षित आहे काय..? या बाबतच्या अहवालाची उलट तपासणी केल्यास हिमायतनगर, तळणी - निवघा, स्टेशन उमरी, विरसणी आदी ठिकाणी डाक विभागात झालेल्या हेराफेरीचे प्रकरणे समोर येतील अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.  

कोई टिप्पणी नहीं: