भारतासह क्युनेटचे जाळे नांदेडमध्येसुध्दा पसरले....जनतेने सावधान राहण्याची गरज


नांदेड| भारतात क्युनेटने आता थैमान घातले असून आतापर्यंत देशातून 58 लोकांना अटक केली आहे. त्यांचे 2.7 कोटी रुपये सरकारने फ्रिज केले आहेत. नांदेडमध्ये सुध्दा क्युनेटचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असून अनेक मोठी लोक त्यात गुंतलेली आहेत.

क्युनेट(मल्टीलेवल मार्केटींग कंपनी) या नावाचे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून कमी पैसे गुंतवूण खुप मोठा नफा मिळतो याचा प्रचार
केला जातो. या प्रचारात कांही लोक फसतात. त्यांना हे माहित नसते की, आपण काय व्यवसाय करणार आहोत. तो कोणता व्यवसाय आहे, त्यातून काय मिळते याची कांहीच जाणिव नसते. फसलेल्या माणसाला आपले गुंतवलेले पैसे बाहेर काढायचे आहेत तर त्यासाठी त्याला इतरांना फसवल्याशिवाय दुसरा मार्ग  नाही. कांही दिवसांपुर्वीच देशात क्युनेटच्या 57 लोकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे आणि या सर्व प्रकारात भारतातील 30 लाख लोकांना फटका बसलेला आहे.

क्युनेटचा प्रभाव नांदेडमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. प्राप्त माहितीनुसार कंत्राटदार, वैद्यकीय प्रतिनिधी आणि वैद्यकीय व्यवसायिक या क्युनेटमध्ये फसलेले आहेत. आता छोट्या-छोट्या गावांमध्ये इंटरनेट सुविधा प्राप्त झाली असली तरी त्याचे संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे छोट्या-छोट्या गावातील मंडळी यात फसत चालली आहे. फसलेली मंडळी या संदर्भाने कोणालाही कांही सांगत नाहीत आणि त्यांचे थोडेसे फसलेले पाय या चुकीच्या पध्दतीने मोठा फायदा मिळवण्याच्या गर्तेत पूर्ण फसली जातात. आज पर्यंत प्रसार माध्यमांनी अनेकवेळेस अशा चुकींच्या गोष्टींकडे लक्ष देण्याअगोदर त्याची शहानिशाह करावी या संदर्भाने माहिती प्रसारीत केली. तरीपण भारतातील सर्वसामान्य भोळी जनता अशा चुकीच्या अमिषाला बळी पडते आणि त्यांच्या आर्थिक चक्राची ताटातुट होते आणि सर्वकांही उदवस्त होते. अशा प्रकरणांमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांची सुध्दा जनतेला वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधून ती गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा फायदा या संदर्भाने शहानिशाह करण्याचे आवाहन केले आहे. पण जनता कधीच पोलीसांकडे जावू या संदर्भाने विचारणा केल्याचे उदाहरण नाही. नांदेड जिल्ह्यातील कोणाकडे ह्या क्युनेट गुंतवणूकीच्या संदर्भाने कांही माहिती असेल तर त्यांनी आजही पोलीसांशी संपर्क साधून या संदर्भाची माहिती सांगावी आणि त्यातील सत्यता जाणून घ्यावी असे आवाहन दैनिक आनंदनगरीच्यावतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी