महाराष्ट्राच्या हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबीयात महाराष्ट्र भवन बांधणार - जमाल सिद्दीकी


नांदेड| महाराष्ट्रातून जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबीयामध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी लवकरच मंजूरीपण मिळेल असा विश्र्वास हज कमिटीचे चेअरमन जमाल सिद्दीकी यांनी केले.

हज कमिटी चेअरमन जमाल सिद्दीकी नांदेडच्या दौऱ्यावर आले असतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी एजाज देशमुख व अकबर पठाण हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना जमाल सिद्दीकी म्हणाले महाराष्ट्रातून जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी 1200 कोटी रुपये त्यांच्या राहण्यावर खर्च होतो. त्यापेक्षा तेथे जमीन लिज तत्वावर घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जणेकरून दरवर्षी होणारा 12 कोटी खर्च वाचेल. हज यात्रेकरूंसोबत अनेकदा फसवणूक होते आणि लोक ठगले जातात. त्यासाठी हज कमिटीने एसओजी (हज ऑर्गनाझर गु्रप)  गु्रप तयार केला आहे. या गु्रपमध्ये शासनाकडून नोंदणीक्रत केलेल्या खाजगी हज ट्रॅव्हल्स आहेत. त्या ट्रॅव्हल्सना दरवर्षी नोंदणी करावी लागते. ही नोंदणी त्यांच्याकडून हज यात्रेला जावून आलेल्या यात्रेकरूंनी दिलेल्या अनुभवांच्या आधारावर त्यांना मिळते. कोणी हज यात्रेकरूंची फसवणूक केली असेल तर त्यांच्याविरुध्द मकोका कायद्याअंतर्गत कार्यवाही होणार आहे.

हज कमिटीची संरचना सांगतांना त्यात 16 सदस्य असतात, एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक सचिव असतो, इतर सदस्यांमध्ये दोन आमदार, दोन खासदार, एक वफ बोर्डाचा माणूस स्वयंसेवी संस्थांचे पाच, नगरसेवक तीन आणि धर्मशास्त्र जाणणारे तीन सदस्य असतात.  त्यात एक सहसचिव दर्जाचा व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. माजी नियुक्ती फेबु्रवारी 2019 मध्ये झाली आणि 7 एप्रिल रोजी या 16 सदस्यी समितीने माझी चेअरमन पदावर नियुक्ती केली.

यंदाच्या वर्षी 25 हजार हज यात्रेकरूंचा कोटा वाढवून मिळाला आहे. त्यात नांदेडमध्ये 1136 अर्ज आले होते. त्यातून 518 जणांची हज यात्रेसाठी निवड झाली आहे. राज्यासाठी 2387 जागा वाढवून मिळाल्या आहेत. हज यात्रेमध्ये शासकीय नोकर असलेल्या लोकांना खादीमे हुज्जाद म्हणून पाठविले जाते. त्यांची संख्या 68 आहे. पण खादीमे हुज्जाद पाठवूच नये असे माझे मत आहे. कारण ते हज गाईड असतात. त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या खर्चापेक्षा कमी खर्चामध्ये सौदी अरेबीयामधून हज गाईड घेतले जावू शकतात. यंदाच्या वर्षी हज यात्रेकरूंसाठी एक तांत्रिक ऍप तयार केली असून कोणी हज यात्रेकरू तेथे हरवला तर त्यासाठी त्याचा शोध घेता येईल आणि त्या ऍपच्या माध्यमाने तो सुध्दा आपल्या निश्चित स्थळी जावू शकेल. हज यात्रा हे तीन महिन्याचे काम आहे. त्यानंतर हज कमिटीला कांहीच काम नाही म्हणून उमराला(हजशिवाय यात्रेला जाता येईल) जाण्यासाठी हज कमिटी प्रयत्नशिल राहिल त्यामुळे वर्षभर हज कमिटी काम करेल. जिल्हा स्तरावर हज कमिटी स्थापन होणार आहे. त्यासाठी लवकरच निर्णय जाहीर होईल आणि त्यातून हज यात्रेकरूंशी संपर्क करणे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अशी कामे केली जातील. यंदा भारतातून 2 लाख हज यात्रेकरू यात्रेला जाणार आहेत. हा जगातील दुसरा क्रमांक आहे. भारताच्या पुढे इंडोनेशीया या देशातून 2 लाख 10 हजार हज यात्रेकरू जात आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी