NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

मंगलवार, 18 जून 2019

नवीन आलेल्या 16 पोलीस उपनिरिक्षकांना नियुक्त्या


नांदेड| जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या 16 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या देण्याचे आदेश पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी 17 जून रोजी सायंकाळी जारी केले आहेत.

लोकसभा निवडणुक झाल्यानंतर नांदेडच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांनी हिंगोली, नांदेड, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांना
जिल्हाअंतर्गत बदल्या दिल्या. त्यात चारही जिल्ह्यांमधून नांदेड जिल्ह्याला नवीन 16 पोलीस उपनिरिक्षक हजर झाले. हजर झालेल्या पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी पुढे कंसात लिहिल्याप्रमाणे पोलीस ठाण्यात नियुक्त्या दिल्या आहेत. सुवर्णा श्रावण उपाम (कंधार), प्रियंका राजकुमार आघाव (सायबर), जनाबाई अश्रुबा सांगळे (देगलूर), ज्ञानेश्वर श्रीहरी करदोरे (नांदेड ग्रामीण), अल्ताफ आयुब मुलाणी(कंधार), नागोराव विठ्ठल मोरे (हदगाव), राजू अशोक मोरे (वाचक उपविभाग किनवट), प्रकाश भाऊराव शिंदे (वाचक उपविभाग कंधार), सुकेशनी दिलीप जाधव (सेवाअंतर्गत प्रशिक्षण), माधवी मुरलीधर मस्के (अर्धापूर), बसवेश्र्वर रामचंद्र जाकीकोरे (देगलूर), महेंद्रसिंह सुरेंद्रसिंह ठाकूर (देगलूर), विनायक अभिमान लंबे (वजिराबाद), महेश अंबादास गळगटे (पोलीस नियंत्रण कक्ष), अनिता विठ्ठल इटुबोने (मुखेड), हबीबखान मेहमुदखान पठाण (पोलीस नियंत्रण कक्ष). या नियुक्त्यांमध्ये 16 पैकी 3 पोलीस उपनिरिक्षक देगलूर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत.

कोई टिप्पणी नहीं: