अवैधरित्या वाळू उपसा व वाहतुकीच्या 72 कार्यवाहीत 74 लाख 64 हजारांचा महसूल

धर्माबाद उपविभागात अंतर्गत गतवर्षीच्या वाळूसाठे लिलावातूनही 2 कोटींचा महसूल प्राप्त

धर्माबाद| उपविभागा अंतर्गत येणाऱ्या उमरी व धर्माबाद  या दोन तालुक्यातील आवैधरित्या वाळू उपसा व वाहतुकीच्या बाबतीत धर्माबाद उपविभागाचे उपविभागिय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ व ज्योती चव्हाण  त्यांच्या टीमने चालू वर्षात धडाकेबाज कार्यवाही केली असून सदरील दोन्ही तालुक्यातील चालू वर्षातील एकूण 72 कार्यवाहीत शासनाला 72 लाख 64 हजारांचा महसुल मिळाला आहे तर उमरी
तालुक्यातील गोदावरीच्या काठावर गतवर्षी साठविण्यात आलेल्या रेती लिलावातून सुमारे 2 कोटींचा महसूल मिळाला आहे. या वर्षीही नदीच्या काठावर आवेधरित्या साठविण्यात आलेल्या रेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून यावेळी गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने महसूल प्राप्त होणार आहे.

 अवैधरित्या रेतीची वाहतूक व साठेबाजी होणार नाही याकरिता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांनि प्रत्यक्ष सर्व ठिकाणी पोहचुन अनाधिकृत वाळु साठे जप्त करीत जिल्हाधिकारी यांच्या कडे आहवाल सादर केला आहे. तसेच नदीकाठच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आली असून नदीकडे  वाहतुकीकरिता जाणारे प्रमुख रस्ते खड्डे मारून  वाळु वाहतुकीकरिता प्रतिबंधीत करण्यात आले आहेत. मधील काळात महसूलचे अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आसल्याची संधी पाहून वाळू माफिया सक्रिय झाला होता मात्र निवडणूक काम आटोपटाच दुस-याच दिवशीपासून सलग 4 दिवस पूर्ण परिसरात ते स्वतः जाऊन सर्व वाळूसाठे जप्त करीत धडाकेबाज कार्यवाही करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे. निवडणूक ताण  कर्तव्यास प्राधान्य देत उपविभागिय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांनी वेळीच कार्यवाहीचे अस्त्र उगारल्याने गोदावरीचे पात्र सुरक्षित राहिले आहे. धर्माबाद व उमरी तालुक्यात 1एप्रिल 2018 ते 31 मे 2019 च्या कालावधीत एकूण 72 कार्यवाहीत सुमारे 72 लाख 64 हजार व गतवर्षी च्या वाळुसाठेबाजी प्रकरणातील लिलावातून सुमारे 2 कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आसून हा महसूल एव्हढ्या मोठ्याप्रमाणात मिळण्याची ही प्रथमच वेळ आहे. गोदावरीचे नदीपात्र सुरक्षित रहावे या करिता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागिय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ व तहसीलदार ज्योती चव्हान  यांनी विवीध पथके व गस्ता वाढविल्याने आवेधरित्या वाळू उपसा व वाहतुकीला लगाम बसला आहे.यंदाच्या वर्षांतील शिल्लक व  जप्त वाळूसाठ्या बाबतीत प्रशासकीय आहवाल पाहता जिल्ह्यात सर्वाधिक महसूल धर्माबाद उपविभागावातूनच मिळेल असे दिसत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी