मुखेड निवडणूक विभागाच्या भोगंळ कारभाराने शेळकेवाडी प्राथमिक शाळेला पहील्याच दिवशी सुट्टी

मुखेड| तालुक्यातील एक पंचायत समिती गण  व  ग्राम पंचायत पोटनिवडणुकीसाठी काही शिक्षकांना निवडणूक  प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मात्र ही जबाबदारी टाकताना विद्यार्थ्यांचा विचार केला गेला नसल्याचे दिसून येत आहे. दोन शिक्षकी शाळेवरील एक कर्मचारी आईच्या निधनामुळे दीर्घ रजेवर तर दुसऱ्या शिक्षकाला इलेक्शन ड्युटी यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपानंतर सुट्टी देण्यात आली.
यामुळे पोटनिवडणूक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मुळावर आल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील जांब पंचायत समिती गणाची व तालुक्यातील काही ग्रामपंचायत सदस्यांच्या पोट निवडणुकीचे मतदान 23 जून रोजी होणार असून या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी काही प्राथमिक शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावताना त्या शाळेवर किती शिक्षक आहेत व किती विद्यार्थी आहेत याचा विचार केला नसल्याचे दिसून येते तालुक्यातील वर्ताळा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या शेळकेवाडी येथील प्राथमिक शाळेत 40 पेक्षाही जास्त विद्यार्थी ज्ञानार्जन घेतात या विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याची जबाबदारी दोन शिक्षकावर आहे मात्र यातील एक शिक्षक सुभाष बालाजी दिग्रसकर यांच्या मातोश्रीचे गुरुवारी  निधन झाल्याने निधनानंतर करण्यात येणाऱ्या विधी पूर्ण करण्यासाठी त्यांनी दीर्घ रजा शिक्षण विभागाकडे पाठविली आहे यामुळे आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक बळीराम निवृत्ती दूरनाळे यांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मोफत पुस्तके वाटप केली शाळेच्या पहिल्या दिवशीच म्हणजे 17 जून रोजी या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रथम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यामुळे मुख्याध्यापक दुरनाळे यांनी पुस्तक वाटप केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना घरी पाठवून शाळेला कुलूप घातले व 11 वाजता आयोजित निवडणूक प्रशिक्षण स्थळी आले यामुळे आज पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली विशेष बाब म्हणजे या शाळेतील दोन्ही शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली असल्याचे कळते यात एका शिक्षकांची आई वारल्याने ते सध्या दीर्घ रजेवर असल्याने दुसऱ्या शिक्षकाला नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना घरी पाठवून शाळेला कुलूप घालून निवडणूक प्रशिक्षणासाठी जावे लागले आगामी 20 व 22 जून रोजी पुन्हा निवडणूक प्रशिक्षण असल्याने याही दिवशी शाळेला कुलूपच राहण्याची शक्यता दिसून येत आहे एकीकडे शासन प्रत्येकांना शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून विविध उपाययोजना करीत असताना दुसरीकडे निवडणूक विभागाकडून निवडणूक ड्युटी लावताना त्या शाळेवर किती विद्यार्थी आहेत व किती शिक्षक आहेत याची दखल घेतली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे. शिक्षकांना निवडणुक जबाबदारी लावणे हा शासनाचा विषय असला तरी पहिल्याच दिवशी हे शिक्षक निवडणुकीच्या कामात गर्क राहिल्याने पहिल्यादिवशी मोठी आशा घेवून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षकच भेटले नाही. त्यामुळे त्यांचा झालेला हिरमोड हा त्यांच्या बालमनावर परिणाम करणारा ठरू नये अशी अपेक्षा आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी