भाकपचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
माहुर (नृसिंह न्यूज नेटवर्क) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड जिल्हा सचिव काॅ.अर्जूण आडे यांना काल दि.24/11/20 17 रोजी पोलीस शिपाई इद्रीस बेग यांनी किनवट येथिल उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात धक्का देऊन आपमानीत केल्यामुळे त्या पोलीस शिपाईला त्वरीत निलंबीत करा. अन्यथा उग्र स्वरुपाचे अंदोलन करण्यात येईल अशी मागणी माहुर तालुका भाकप (मार्क्सवादी) पक्षाच्या वतिने उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड जिल्हा सचिव काॅ.अर्जूण आडे यांना काल दि.24/11/20 17 रोजी किनवट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या नामनिर्देशन पत्र भरण्या साठी अवश्यक असलेल्या मतदार यादी घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात जाऊन परत येत असतांना त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई इद्रीस बेग यांनी त्यांना धक्के मारीत जनते समोर जाहिर अपमानित केले.या घटनेच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका कमिटीच्या वतिने निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आले. आणि पोलीस शिपाईला त्वरीत निलंबीत करा अशी मागणी काॅ.शंकर सिडाम, किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण, डाॅ.बि.व्ही.डाखोरे, दिलीप गवळी, संजय मानकर, राजकुमार पडलवार, गंगाजी मेश्राम यांनी स्वाक्षरी असलेल्या निवेदनात केली आहे.