NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

शनिवार, 25 नवंबर 2017

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच्या इमारतीवरून एक पोलिसाने केला आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनीच ठरवला निष्क्रिय 

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) आज सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालया समोर डॉ. हंसराज वैद्य यांच्या इमारतीवरुन स्वतःच्या गळ्यात दोरी बांधून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेला प्रकार वजिराबादचे पोलीस निरीक्षक आणि अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून हाणून पाडला.

आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर काही
वेळेपर्यंत एक माणूस एक बॅनर लावत आहे असे दिसते. बॅनर लावल्यावर त्या माणसाने गच्चीवरच्या छोट्याशा भिंतीवर बसून स्वतःच्या गळ्यात जाड दोरी टाकली. ती दोरी खांबाला बांधली आणि आता मी मरणार आहे असे सांगत होता. या संदर्भाने माहिती घेतली असता तो पोलीस कर्मचारी होता त्याचे नाव संजय मल्हारराव जोंधळे बकल नं.422 आणि पोलीस मुख्यालय नांदेडमध्ये तो कार्यरत आहे असे एका कार्यक्रम पत्रिकेवरुन दिसते. त्याने संविधान गौरव असा एक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम यशवंत सेवाभावी संस्था पानभोसी ता.कंधार आणि नंदीग्राम मल्टी सर्व्हिसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26 नोव्हेंबर 2017 रोजी स्नेहनगरच्या पोलीस वसाहतीत आयोजित आहे असे त्या पत्रिकेत नमुद आहे. हा कार्यक्रम आयोजित करताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, प्रमुख पाहुणे माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुरडकर आणि प्रमुख उपस्थितीत विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांची नावे त्या पत्रिकेत लिहिलेली आहेत. या कार्यक्रमात नंदीग्राम मल्टीसर्व्हीसेसचे ऍड.प्रवीण आयाचित हे निमंत्रक आहेत.

प्राप्त माहितीनुसार आज सकाळी साडेदहाच्या सुमारास संजय जोंधळे हे पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले पण स्वागत कक्षातून त्यांना पुढे जावू देण्यात आले नाही. त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या सर्व कार्यक्रमाची परवानगी घ्यायची होती असे समजले. पण स्वागत कक्षातील पोलिसांनी संजय जोंधळेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे जावू दिलेच नाही आणि त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी थेट डॉ.हंसराज वैद्य यांच्या गच्चीवर जावून आत्महत्या करण्याचा देखावा निर्माण केला. या सर्व धामधुमीत रस्त्यावरची वाहतूक खोळंबली, हजारो लोक रस्त्यावर थांबले आणि संजय जोंधळेवरुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत होते. 

वजिराबादचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, त्यांचे अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनेक पोलीस कर्मचारी तेथे हजर झाले. सर्वप्रथम डॉ.हंसराज वैद्य आपल्या घरच्या गच्चीवर गेले आणि संजय जोंधळेला बोलत होते. त्यानंतर अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी एका झटक्यात संजय जोंधळेचा ताबा घेतला आणि त्यांना उचलून खाली आणले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा आणि अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही असे तो सांगत होता. सर्व धामधुमीमध्ये संजय जोंधळे यांचा मुलगा पण तेथे आला आपल्या वडिलांची अवस्था पाहून त्याला रडूच कोसळले.पोलिसांनी आपलाच सहकारी पोलीस आहे या प्रेम भावनेतून त्याला सध्या विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले आहे. झालेल्या या प्रकाराने मात्र अनेक चर्चांना उधान आले आहे, प्रत्येक माणूस आपल्या परीने या घटनेचे विवेचन करीत आहे. पण प्रत्यक्षात संजय जोंधळेने असे का केले, त्यांना कार्यक्रमाची परवानगी का दिली गेली नाही असे अनेक प्रश्न प्रलंबितच राहणार आहेत. संविधान गौरव साजरा करण्याचा अधिकार संजय जोंधळेला नाही काय..? हा एक प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. संजय जोंधळेंवर उपचार सुरु असल्याने वृत्त लिहीपर्यंत त्यांच्यावर काही कार्यवाही झाली की नाही या बद्दल माहिती प्राप्त झाली नाही.

कोई टिप्पणी नहीं: