कॉ. अर्जुन आडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करा - माकपा.

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अर्जुन आडे हे दि. 24 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले असता एका पोलीस कर्मचाऱ्यांनी विनाकारण त्यांच्याशी हुज्जत घालत, बाचाबाची करून धक्काबुकी केली. 


ज्या माणसांनी गेली 25 वर्षात सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, शेतकरी, श्रमिक वर्गातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करणाऱ्या आणि जातीय व सामाजिक सलोखा राखण्यासाठी अविरत प्रयत्नशील असणाऱ्या नेत्याला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ व धक्काबुकी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करावे आणि भीम आर्मी संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर सुडभावनेतून दाखल केलेला रासुका मागे घेण्यात यावा, यासाठी शनिवारी माकपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. या निदर्शनेला संबोधित करताना कॉ. गंगाधर गायकवाड यांनी उपरोक्त उल्लेखलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित न केल्यास माकप शहर कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली. या निदर्शनात कॉ. विनोद गोविंदवार, बालाजी कलेटवाड, विकास वाठोरे, उज्ज्वला पडलवार, मीना आरसे, मंजुश्री कबाडे, माधव देशटवाड, धनंजय हाटकर, संदीप लोणे, विक्रम वाघमारे, विठ्ठल यलगंदेवाड, शंकर बादावाड, आकाश देशटवाड, अविनाश घाडगे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी