नविन नांदेड़ (नृसिंह न्यूज नेटवर्क) बळीरामपुर येथील काहि लाभार्थ्याना संजय ग़ांधी निराधार योजना व श्रावण बाळ या योजनेचा लाभ गेल्या वर्षापासून मिळाला नसून त्यासाठी गावात दवंडी देऊन आज ग्रामपंचायत येथे मा.जीप सदस्य आनंद गुंडले व सरपंच आमोल गोडबोले यानी त्यांची कागद पत्र तपासून नायब तहसीलदार पाटे यांच्या स्वाधीन केले.
बळीरामपुर येथील मागील वर्षा पासुन संजय ग़ांधी निराधार, श्रावनबाळ योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे आधारलिंक करूनही त्यांच्या खात्यात पैसे येत नसल्या मुळे व बायोमेट्रिक पद्धतीत सुद्धा पैसे मिळत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर लगेच गावात दवंडी देऊन दी 23नोहेम्बर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे बेठक घेऊन व नायब तहसीलदार पाटे यांच्याशी चर्चा करुन उर्वरित लोकांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन माजी जीप सदस्य आनंद गुंडले यानी ग्रामस्याना दिले. यावेळी ग्राम प. सदस्या गुनाबाई पंडित, रंजनाबाई सोनकाबले, अशोक वाघमारे, राजेश वाघमारे, बालू वाघमारे, शेख सलीम, सुनकेवार, हटकर, यांची उपस्तिति होती.