आपल्या वहिनीवर बलात्कार करणाऱ्यास दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड (एनएनएल) एका फळ विक्रेत्याने आपल्या वहिणीवर बलात्कार केल्यानंतर सहाव्या प्रथमवर्ग न्याय - दंडाधिकारी पी. एम. एन. देशमुख यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

एक फळविक्रेता विमानतळ रस्त्यावर आपली पत्नी आणि तीन मुलांसह राहतो. काल 8 ऑगस्ट रोजी तो आपली फळाची गाडी घेवून फळ विक्री करण्यासाठी गेला तेंव्हा त्याच्या मावशीचा मुलगा फेरोज खाजामियॉ पठाण (26) रा. सिडको हा त्यांच्या घरी आला.फेरोज पठाण सुद्धा फळ विक्रेता आहे. त्यावेळी फेरोज [पठाणची वहिणी (28) ही आणि एक लहान बालक घरी होते. दोन मुले शाळेला केली होती. आपला दीर आला म्हणून त्यास जेवण करण्यास वहिणीने सांगितले. पण दीर जेवण करण्यासाठी आला नव्हता तर तो आपल्या वहिणीकडे शरीर सुखाची मागणी करु लागला. तिने सांगितले की माझा नवरा आहे, लेकरे आहेत अशी मागणी बरोबर नाही. पण फेरोज पठाणने वहिणीचे काहीच न ऐकता तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला आणि निघून गेला. 

आपल्यावर झालेला अत्याचार आणि त्यामुळे होणारी बदनामी या भितीने त्या 28 वर्षीय विवाहित महिलेने भरपूर रॉकेल पिवून घेतले आणि त्यानंतर तब्येत खराब झाले. तिला नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उपचारार्थ  दाखल करण्यात आले. तिने हा सर्व जबाब रुग्णालयात दिला. विमानतळ पोलिसांनी त्वरित फेरोज खाजामियॉ पठाणला आणले आणि विवाहितेच्या तक्रारीनुसार त्याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्यास अटक केली. पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद, पोलीस कर्मचारी गायकवाड, तांबारे, पाटील आणि रामदास सूर्यवंशी यांनी त्यास न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. मोहंमद रजियोद्दीन यांनी तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी देणे हे आवश्यक असल्याचे न्यायालयासमक्ष मांडले. न्यायाधीश देशमुख यांनी आपल्या वहिणीवर बलात्कार करणाऱ्या फेरोज पठाणला दोन दिवस अर्थात 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी