विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या कार सह चार लाखाचा मुद्देमाल जप्त

माहुर पोलीसांची नाकाबंदी मध्ये कार्यवाही
माहुर (एनएनएल) पुसद वरुन माहुर शहरात दाखल झालेल्या मारोती एस. ऐक्स.फोर या कारची टि पाईंट येथे नाका बंदी करुन तपासणी केली असता सपोनी शिवप्रकाश मुळे यांना गाडीत खचाखच भरुन असलेले विदेशी दारुचे बाॅक्स आढळून आल्याने गाडी व चालका ला ताब्यात घेऊन त्यांचा वर कार्यवाही करण्यात आली.हि धडाकेबाज कार्यवाही आज दि.8 (मंगळवार)रोजी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान करण्यात आली.


काल सोमवारी रात्री संपलेल्या माहुर गडावरील दोन दिवसीय पराक्रमा यात्रेच्या काळात बंदोबस्ताच प्रचंड ताण व थकावा असतांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार रात्री नाकाबंदी करण्यात आली.नाका बंदीच्या काळात वाहने तपासत असताना पुसद मार्गा कडुन एम.एच.19 ए.ई.6102 हि मारोती एस. ऐक्स.फोर अलिशान काराची सुद्धा सपोनी शिवप्रकाश मुळे ए. एस. आय ठोबंरे, जमादर गजानन कुमरे,शेख हैदर यांनी तपासणी केली असता त्यात गाडीतील चालक अजय मोतीलाल जैस्वाल वय (34)रा.राजेंद्र नगर किनवट याने गाडीत नंबर वन 16 बाॅक्स (280) बाॅटल, आय.बी.06 बाॅक्स(280)बाॅटल,ओसी 04 बाॅक्स (192)बाॅटल,नंबर वन 750 मिली च्या 02 बाॅटेल असा एकुन 38 हजार 778 रुपयाचा माल व 3 लाख 50 हजाराची कार जप्त केली आहे. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या विदेशी दारु च्या बाटल्या वरील अत्यअल्प असलेल्या किंमती पाहुन सदर ची दारु हि बनावट असावी असा पोलिसांचा संशय आहे.180 मीली च्या बाटली वर केवळ 47 तर 750 मिली च्या बाटली वर 237 रुपये एमआरपी टाकलेली आहे.मात्र बाटली व त्याची पैकिंग हुबेहु असल्याने हा संपुर्ण माल बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांच्या जिवाशी खेळ चालविणाऱ्या या गोरखधंद्याच्या तपासात पोलीस मुळात गेल्यास संपुर्ण रॅकेट चा भांडाफोड होऊन या गैर प्रकारावर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पथक भुमिगत झाल्यानंतर सर्वात मोठी कार्यवाही 
माहुर पोलीस ठाण्याला अपुरा मनुष्य बळ,नेहमी दर्शनासाठी येणारे मोठे अधिकारी, नेतेमंडळी, मोर्चे, अंदोलन हे नियमीत असतांना सुद्धा अवैध धंद्याविरुद्ध मोहिम हाती घेऊन व पोलीसी बळगा उभारुन सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी अवैध धंदे करणाऱ्यास जेरीस आणले आहे.सिंगम इस्टाई कार्यवाहीचा धस्का गुन्हेगारांनी घेतल्या मुळे मटका,जुगार व अवैध दारु विक्रीला अंकुश लागला असुन पेट्रोलींग मुळे बाजारपेठ रात्री 10:30 ला बंद होत आहे.आज केलेली चार लाखाच्या जवळपास ची हि कार्यवाही कुठल्याहि गोपनीय माहिती विना नाका बंदी करुन करण्यात आल्याने हि कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भुमिगत झालेल्या पथका नंतरची सर्वात मोठी आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी