NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

बुधवार, 9 अगस्त 2017

राखी पौर्णिमेनिमित्त वृक्षसंवर्धनाची घेतली शपथ

नांदेड (एनएनएल) व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूल, धनेगाव ता.जि. नांदेडच्या विद्यार्थ्यांनी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षांची लागवड केली. तसेच झाडाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.

या कार्यक्रमास बालाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. श्रीदेवी पाटील, उपप्राचार्य विशाल इंगळे, सहशिक्षक बालाजी कडबे, वर्षा घुंगराळे, ममता जयस्वाल, अर्चना अलमखाने, स्वाती बिरदे, आरती दुमणे आदी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे उपक्रम राबविण्यामागे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन याविषयी प्रेम निर्माण व्हावे हा उद्देश असल्याचे यावेळी प्राचार्या श्रीदेवी पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजन बालाजी कडबे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं: